महाराष्ट्र वेदभुमी

ग्रामदैवत श्री धाविर महाराज देवघटावरून उठले ; आज (बुधवारी) पालखी सोहळा.




रोहा दि. २४ ऑक्टो.विशेष प्रतिनिधी ;

धाविर महाराजांचा नवरात्रोत्सवाची सांगता भव्य दिव्य अशा महाराजांच्या पालखी सोहळयाने 

अवघ्या रायगड वासियांचे श्रध्दास्थान आणी रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराजांना दसऱ्याच्या दिवशी दहाव्या माळेला देवघटावरून मोठया भक्तीभावनेने उठविण्यात आले... उद्या बुधवारी महाराजांच्या पालखी उत्सवास प्रारंभ होणार आहे...नवरात्रीत देवघटी बसलेले घरचे देव कुळदेव, गावदेव आदी देवांना नवव्या माळेला उठविण्याची परंपरा आहे...सोमवारी नवमीला माळा अर्पण करून भक्तीभावनेने विधीवत या देवांना उठविण्यात आले... यानंतर दसऱ्याच्या दिवशी दहाव्या माळेला श्री धाविर महाराजांना देवघटावरून मोठया भक्तीभावनेने उठविण्याची प्रथा परंपरा प्रचलित आहे...दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी समस्त रोहावासी ग्रामस्थ श्रध्देने आणी पारंपारीक पध्दतीने मांडलेल्या महाराजांचा नवरात्रोत्सवाची सांगता भव्य दिव्य अशा महाराजांच्या पालखी सोहळयाने करताता... 

मंदिरात विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित

दसऱ्याच्या दिवशी श्री धाविर महाराजांना विधीवत पूर्व देवघटावरून उठविण्यात आले... यावेळी मंदिरात विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष मयुर पायगुडे, माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह, समीर शेडगे, विश्वस्त नितिन परब, विजयराव मोरे, सुभाष राजे, समीर सकपाळ, प्रकाश पवार, महेश सरदार, संदीप सरफळे, अमित उकडे, शैलेश रावकर, निलेश शिर्के, राजेश काफरे, रवींद्र चाळके, सूर्यकांत कोलाटकर, प्रकाश पाटणकर, दिलीप वडके आदी मान्यवर उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post