महाराष्ट्र वेदभुमी

स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेचे वर्षपूर्ती निमित्त सर्वत्र कौतुक, गडाचे संवर्धन करत केले विविध कार्यक्रमांनी गडपूजन .

 


💥🔥शिवश्री💥🔥

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे / येर गबाळ्याचे काम नाही //

या ओवीचा अर्थ संस्थेच्या कार्यातून पाहायला गेलो तर संत तुकाराम महाराजांच शब्द न शब्द खरा आहे याची शाश्वती येते... नावापुढे शिवभक्त आणि शिवकन्या लावणारे खूप भेटतील, खूप आहेत पण या संवर्धन कार्यात जो उतरतो तोच खरा मावळा... मोहीम हा इतर लोकांसाठी फक्त एक शब्द असेल पण संवर्धन कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी एक नवीन ऊर्जा प्राप्त करण्याचं ठिकाण आहे...जसं पुस्तक वाचल्याशिवाय त्यात काय आहे हे कळत नाही तसच मोहिमेला गेल्याशिवाय मोहिमेच सुख काय असत हे अनुभवता येत नाही...

खुप सारे प्रतिष्ठान वेगवेगळ्या गडावर संवर्धन कार्य करत आहेत पण एकच गडावर अखंड अविरत मोहीम घेणारी माझ्या ओळखीत तरी ही पहिलीच संस्था आहे... वेगवेगळ्या गडावर मोहीम घेण्यात आणि एकच गडावर मोहीम घेण्यात खुप फरक आहे खर तर खुप अडथळे आहेत...सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्य आणि मदतीसाठी तयार होणारे हात मग ते आर्थिक असूद्या नाहीतर शारीरिक...

मी माझ्या अनुभवातून सांगते आम्ही जेव्हा रायगड विभागात दोन वेगवेगळ्या गडावर मोहीम घेतली.. त्यावेळी संख्या लक्षणीय होती तीच संख्या घोसाळगड वर पहिल्या मोहिमेला दिसली...पण पहिल्या मोहिमेत अपूर्ण राहिलेल टाकीच काम करायला जेव्हा दुसरी मोहीम त्याच गडावर लावली गेली तेव्हा संख्या ७५% झाली आणि अशीच कमी कमी होत गेली...

याचा अर्थ काय मोहिमेला येणाऱ्या मावळ्यांमध्येही प्रकार असतात...कोण एक नवीन गड बघायला मिळेल म्हणून येतो, कोण इंस्टाग्राम, फेसबुक च्या पोस्ट साठी येतो, कोण असच भटकंती म्हणून येतो पण सातत्य तोच टिकवून ठेवतो जो निष्ठेचा मावळा आहे, ज्याला फक्त शिवशंभुंची त्यांच्या गडकोटांची सेवा करायची आहे... आणि याच उत्तर उदाहरण म्हणजे सुरगडाचे शिलेदार...कंपनीच्या शिफ्ट करून गडावर घाम गाळून गडाला नवंचैतन्य देण्याचं काम तुम्ही सुरगडाच्या शिलेदारांनी केलं आहे यासाठी तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे...

तुज मी पाहात रहावं //

तुझ्या रूपास न्याहाळत रहावं//

तू आम्हास ध्यैर्य देत रहावं//

तुझ्या कृपेच्या छायेत मी नांदत रहावं//

हे गडपुरुषा तव चरणांचे दास आम्ही //

तूच आमुची पंढरी तूच आमचे वैकुंठ //

या कवितेनुसार गडाला सर्वस्व अर्पण करून जिद्द आणि चिकाटी ने खऱ्या अर्थाने तुम्ही सुरगडाचे शिलेदार शोभत आहात.. यापुढेही तुम्ही अनेक मोहीम घ्याल आणि गडाला त्याच गतवैभव प्राप्त करून द्याल असा माझाच नाही परिसरातील सर्वच लोकांचा विश्वास आहे...तर अविरतपणे करत असलेल्या सेवे बाबत स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेचे वर्षपूर्ती निमित्ताने गडाचे संवर्धन करत विविध उपक्रम करत गड पूजन केले असल्याने सरगड खऱ्या अर्थाने बोलू लागला असल्याचे सर्वत्र कौतुक होत असून या संस्थेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे...पुन्हा एकदा तुम्हाला वर्षपूर्तीच्या अनेक शुभेच्छा...!

 💥🔥शिवश्री💥🔥

✍️✍️✍️कु. चेतना ताई म्हसकर✍️✍️✍️

🍂🌾🍂🍁☘️🌿🌾🍂🍁☘️🌿🌾🍂🍁☘️🌿🌾

Post a Comment

Previous Post Next Post