अलिबाग( विशेष प्रतिनिधी):
तालुक्यातील पेझारी नजीकच्या दिवलांग येथील धक्कादायक घटना
तालुक्यातील पेझारी नजीकच्या दिवलांग येथील रघुनाथ हिराजी म्हात्रे (५६ ) व त्यांचा मुलगा ॠषिकेश रघुनाथ म्हात्रे या बाप-लेकाचा वीज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.३०) घडली...
मुलगा व वडील रात्री शेतात गेले असताना,वीज पडुन जागीच मृत्यू..विक्रम पाटील यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन
अलिबाग तालुक्यात शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती...अशातच वडील रघुनाथ म्हात्रे व मुलगा ऋषीकेश हे दोघे रात्री शेतात गेले होते...यावेळी त्यांच्यावर वीज पडली व त्यांचा जागीच मृत्यू झाला...त्या दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते...दरम्यान,तहसिलदार विक्रम पाटील यांनी मयत रघुनाथ म्हात्रे व मुलगा ऋषिकेश म्हात्रे यांच्या घरी भेट देऊन त्यांची पत्नी व मुलगा यांचे सांत्वन केले...
