महाराष्ट्र वेदभुमी

पुगांव गावचे सीताराम बाबुराव देशमुख यांचे दुःखद निधन.


पुगांव - रोहा प्रतिनिधी (नंदकुमार कळमकर)

सामजिक कार्यकर्ते,उत्तम शेतकरी,त्रिनयन स्वामी महाराज (बाप्पा)यांचे पुतणे सीताराम बाबुराव देशमुख निधन 

रोहा तालुक्यातील पुगांव गावचे  रहिवासी सामजिक कार्यकर्ते, उत्तम शेतकरी तसेच त्रिनयन स्वामी महाराज (बाप्पा) यांचे पुतणे सीताराम बाबुराव देशमुख यांचे वयाच्या ७० व्या वर्षी वृद्धपकाळाने व अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या या निधनाने देशमुख परिवारांवर दुःखाचे डोंगर पुगांव गावात शोककळा पसरली आहे...

तालुक्यातील,समाजातील,सामाजिक,शैक्षणिक व राजकीय मित्र परिवार व नातेवाईक सगेसोयरे अंत्यदर्शन उपस्थित

सीताराम देशमुख हे सामाजिक शैक्षणिक राजकीय शेती क्षेत्रात तसेच पर्यावरण प्रेमी होते तर ते सर्वांना आण्णा या नावाने सुपरिचित होते त्यांचा स्वभाव शांत संयमी प्रेमळ असा होता सदैव सर्वांच्या परोपकारी पडणाऱे संयमी वृत्तीच्या,मित भाषी,नम्र स्वभाव व दयाळू अंतःकरणाचे,पशु प्राण्यांवर अथांग प्रेम करणारे होते...त्यांच्या निधानाची वार्ता समजतात रोहा, सुधागड सह इतर तालुक्यातील समाजातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय आप्त-स्वकीय मित्र परिवार व नातेवाईक सगेसोयरे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेत त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले...

त्यांच्या पश्चात दोन मुलगे दिनेश देशमुख, राकेश देशमुख, एक मुलगी रोशनी साठे, पत्नी हिराबाई देशमुख, नरेश देशमुख व महेश देशमुख पुतणे असा मोठा देशमुख परीवार आहे...त्यांचे दशक्रियाविधी शुक्रवार दिनांक २७ ऑक्टो २०२३ रोजी पुगांव येथील श्री क्षेत्र कमलेश्वर मंदिराशेजारील तलावावर होतील तसेच अंतिम उत्तरकार्य बारावे धार्मिकविधी रविवार २९ ऑक्टो २०२३ रोजी पुगांव येथील त्यांच्या निवासस्थानी संपन्न होणार आहेत..

Post a Comment

Previous Post Next Post