महाराष्ट्र वेदभुमी

बातमीचा इन्फॅक्ट.रेन वॉटर हार्वेस्टिंग टाकीचे बातमी नंतर काम सुरू


 
माणगाव प्रतिनिधी (सिकंदर आंबोणकर)

खामगाव ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग टाकीचे काम सुरू

दि.२०/१०/२०२३ रोजी महाराष्ट्र वेदभुमी वृत्तपत्राने मु.पो.खामगाव,ता. माणगाव-रायगड गृप ग्रामपंचायत संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती की,ग्रामपंचायतीने खामगांव येथील अंगणवाडीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामाची सामाजिक कार्यकर्ते राकेश वाघरे, निलेश वाघरे व त्यांचे सहकारी परेश खडस, प्रमोद निंबरे, सिजाऊद्दीन जोगीलकर, नासीर जोगीलकर तसेच मुंबई मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी पोलखोल केली होती व सदर कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विद्यमान सरपंचा वर केला होता.. व तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले होते... महाराष्ट्र वेदभुमी न्युज चॅनलने वृत्तपत्र तसेच  चॅनलच्या माध्यमातून सदर बातमी प्रसिद्ध केली होती...त्या बातमीचा इन्फॅक्ट झाला असून ग्रामपंचायतीने अंगणवाडीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग टाकीचे काम तत्काळ सुरू केले आहे...

महाराष्ट्र वेदभुमीचे प्रतिनिधी व वाघरे बंधू व त्यांच्या सहकाऱ्यांचे पंचक्रोशीमधुन कौतुक

महाराष्ट्र वेदभुमीचे प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर यांनी सदर विषयाची  गांभीर्याने अचूकता दाखवून हा विषय महाराष्ट्र वेदभुमी माध्यमाने प्रसिद्ध करून विषय लाऊन धरल्यामुळे ग्रामस्थांनकडुन वाघरे बंधू व त्यांच्या सहकाऱ्यांचे पंचक्रोशी मधुन वाहवा होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post