महाराष्ट्र वेदभुमी

आंबेत-म्हाप्रोळ पुलाची रहदारी सुरू करण्याच्या मागणी साठी होणाऱ्या उपोषणाला जाहीर पाठिंबा



रोहा प्रतिनिधी (शहानवाज मुकादम)

कोकणाचे भाग्यविधाते देशाचे माजी मंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब व त्यांचे चिरंजीव स्वर्गीय नवीद बाबा अंतुले यांचा अस्तित्व टिकून राहावा म्हणून हा लढा,मंडणगड तालुक्यातील म्हाप्रोळ मोहल्ला येथील मनसेचे स्थानिक  जिद्दी कार्यकर्ते व तालुका उपाध्यक्ष मंडणगड व रस्ता स्थापना सेना जिल्हा संघटक श्री मुस्तकिम कारविणकर यांनी तालुका पदाधिकारी  यांच्या सहकार्याने प्रशासनाला जाहीर ईशारा देत आंबेत पुल रहदारी सुरू करण्यासाठी दिनांक २४ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाला बसण्याच्या केलेल्या संकल्पाला जाहीर पाठिंबा दिला आहे...


स्थानिक महाराष्ट्र् सैनिक तसेच स्थानिक जनतेने ह्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी आपले नाव गाव लिहून ऍड करून समुहात पाठविण्यात आला आहे...

आंबेत पूल सुरू करून बाजूला नवीन पुलाच्या निर्मितीची देखील मागणी ग्रामस्थांकडून होत असल्याचे श्री मुसतकिम कारविणकर म्हणाले...

Post a Comment

Previous Post Next Post