महाराष्ट्र वेदभुमी

रोहा तालुक्यातील ३ प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण १३ जागा रिक्त ; रिक्त जागांचा तालुक्यातील आरोग्यसेवेवर परिणाम




कोलाड प्रतिनिधी(श्याम लोखंडे)

केंद्रात १६ पैकी ७ जागा रिक्त, नागोठणेसाठी १०८ अँबुलन्स उपलब्ध नसल्याने  उपचारासाठी गैरसोय 

रोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मंजूर एकूण ४६ जागांपैकी १३ जागा रिक्त आहेत...परिणामी तालुक्यातील आरोग्यसेवेवर याचा परिणाम होत आहे, तालुक्यातील नागरिकांना वेळेवर योग्य उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत...त्यांची गैरसोय होत आहे...उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर त्याचा अतिरिक्त ताण येत आहे... तालुक्यातील ३  प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती खालीलप्रमाणे असून कोकबन मध्ये ५ , आंबेवाडी केंद्रात १ , नागोठणे मध्ये ७ जागा रिक्त असल्याने त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होत आहे... तिन्ही प्रा.आ. केंद्रात औषधांसाठा मुबलक असून त्याची तपासणी गेल्या ९ ऑक्टोबरला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे... -महामार्गावरील नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ अँबुलन्स नाही -नागोठणे हा गाव मुंबई गोवा महामार्गावर असून या प्राथमिक आरोग्य केंद्र या महामार्गाला लागून आहे, रस्त्यावरील अपघातानंतर रुग्णांना याठिकाणी प्रथमोपचारासाठी आणले जाते, परंतु या केंद्रात १६ पैकी ७ जागा रिक्त आहेत, शिवाय नागोठणेसाठी १०८ अँबुलन्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना तातडीच्या उपचार मिळताना मोठी गैरसोय होते...

कोलाडात १०८ अँबुलन्समुळे वाचले चिमुरडीचे प्राण -कोलाड येथे झालेल्या अपघातावेळी अत्यावश्यक सेवेतील १०८ नंबरवर संपर्क साधला असता आधी नॉटरीचेबल लागले, नंतर मात्र अँबुलन्सवरील सेवत असलेले डॉ नागे आणि चालक स्वप्नील बाकाडे यांनी गंभिर जखमी असलेल्या चिमुकलीला विलंब न लावता अलिबाग जिल्हा रुग्णालयात नेले...तिथे तिच्यावर योग्य उपचार करून पुढील उपचारासाठी पुढे पाठविण्यात आल्याने त्या चिमुकली प्राण वाचले...योग्य वेळेत डॉ नागे आणि चालक स्वप्नील बाकाडे यांनी अत्यावश्यक सेवा दिल्यान ती चिमुकली मृत्युच्या दारातून परत आल्याचे बोलले जात आहे...

प्रतीक्रिया ;-तालुक्यातील तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातिल रिक्त पदांबाबत लेखी अहवाल आणि मागणीपत्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांच्याकडे दिलेला आहे. उपलब्ध मनुष्यबळातुन नागरिकांना सर्वोतोपरी वैद्यकीय सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे-आदित्य शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी, रोहा

Post a Comment

Previous Post Next Post