कोलाड प्रतिनिधी प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
सरपंचपदाच्या ११ जागेसाठी ६७ उमेदवारी अर्ज दाखल...तर ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या १४४ जागांसाठी ३४७ अर्ज
रोहा तालुक्यात १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या ५ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी २० अक्टों) थेट सरपंचपदाच्या ११ जागेसाठी ६७ उमेदवारी अर्ज दाखल...तर ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या १४४ जागांसाठी ३४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत... तहसील कार्यालयात शेवटच्या दिवशी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी झाली होती...रोहा तालुक्यात स्थानिक पातळीवर विविध पक्षांनी एकत्रीत येत संमिश्र युती झाल्याचे दिसून येत आहे...अर्ज छाननी व अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेला १२ ग्रामपंचायतीच्या उमेदवारांच्या लढती स्पष्ट होतील
तालुक्यातील बहुचर्चित आसलेल्या तसेच स्थानिक नेत्यांचे वर्चस्व कायम असलेल्या १२ ग्राम पंचायतीच्या निवडणुका येत्या ५ नोव्हेंबर रोजी संपन्न होत असुन यासाठी निवणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर शुक्रवारी दिवसभर काही उमेदवारांनी तू.. तू.. मी.. मी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत...त्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी आज सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी होत असून कोण वैद्य आणि अवैद्य याचा फेसला आज होणार आहे...तर उमेदवारी मागे घेण्याची तारीख ही बुधवारी २५ ऑक्टोबर असल्याने कोण उमेदवार उभे आहेत निच्छित होणार आहे...
रोहा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून यात अकरा ग्राम पंचायतमध्ये थेट सरपंच पदासह सद्स्य पदाच्या जागेसाठी निवडणुक तर ऐनघर ग्राम पंचायतमध्ये सद्स्य पदासाठी पोटनिवणूक होत आहे या १२ ग्रामपंचयतीच्या थेट सरपंचपदासाठी ६७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत... तर १२ ग्रामपंचायतीच्या ११४ सदस्यपदाच्या जागेसाठी ३४७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत...
उमेदवारी अर्ज दाखल
यामध्ये खांबेरे ९ ग्रा. सदस्यपदासाठी ३२ उमेदवारी अर्ज दाखल, थेट सरपंचपदासाठी १० उमेदवार अर्ज दाखल. चणेरा ७ ग्रा. सदस्यपदासाठी २१ उमेदवारी अर्ज दाखल, थेट सरपंच पदासाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल. नागोठणे १७ ग्रा. सदस्यपदासाठी ६४ उमेदवारी अर्ज दाखल, थेट सरपंच पदासाठी १० उमेदवारी अर्ज दाखल. तांबडी बुद्रुक ९ ग्रा. सदस्यपदासाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल, थेट सरपंच पदासाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल, न्हावे ९
ग्रा. सदस्यपदासाठी २० उमेदवारी अर्ज दाखल, थेट सरपंचपदासाठी १० उमेदवारी अर्ज दाखल. भातसई ९ ग्रा. सदस्यपदासाठी ३२ उमेदवारी अर्ज दाखल,थेट सरपंचपदासाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल. विरजोली ९ ग्रा. सदस्यपदासाठी १८ उमेदवारी अर्ज दाखल, थेट सरपंच पदासाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल.सानेगाव ९ ग्रा. सदस्य पदासाठी २९ उमेदवारी अर्ज दाखल, थेट सरपंच पदासाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल. कोकबन ९ ग्रा. सदस्यपदासाठी ३५ ग्रा. उमेदवारी अर्ज दाखल, थेट सरपंचपदासाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल. येरळ ९ ग्रा. सदस्यपदासाठी २५ उमेदवारी अर्ज दाखल, थेट सरपंचपदासाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल. आरे बुद्रुक ७ ग्रा. सदस्यपदासाठी १८ उमेदवारी अर्ज दाखल, थेट सरपंच पदासाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल. खारगांव ११ ग्रा. सदसपदासाठी ३६ उमेदवारी अर्ज दाखल, थेट सरपंच पदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत...
राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या विरोधात समिश्र युती होत असल्याने राष्ट्रवादी पक्ष टार्गेट होत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे तालुक्यात होत असलेल्या या निवडणुका मोठ्या अटीतटीच्या होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहेत तर राज्याच्या राजकारणात आणि गावाच्या राजकारणात काही बदल घेणार आहे का हे पाहावे लागेल सध्या तरी राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या विरोधात ठिकठिकाणी समिश्र युती होत असल्याने राष्ट्रवादी पक्ष टार्गेट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात शेतकरी कामगार पक्ष, शिंदे गट, भाजप व ठाकरे गट यापुढे आपली किती ताकद अजमावणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...

