तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा...तहसीलदार मुरूड मा. रोहन शिंदेंसह केंद्रप्रमुख,साधनव्यक्ती,परीक्षक आदी उपस्थित
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मुरूड तालुक्यामध्ये तालुकास्तरीय पाककृती सपर्धेचे आयोजन करण्यात आले होते...त्यानिमित्ताने ही स्पर्धा गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झाली...सदर स्पर्धेच्या ठिकाणी तहसीलदार मुरूड मा.रोहन शिंदे ,पोलीस निरीक्षक मुरूड मा. निशा जाधव (PI),गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुरूड मा.सुनील गवळी तसेच सर्व केंद्रप्रमुख,साधनव्यक्ती,परीक्षक आदी उपस्थित होते...
सर्व स्पर्धकांना शिक्षण विभाग या कार्यालयामार्फत देण्यात आल्या भेटवस्तू
सदर स्पर्धेसाठी प्रत्येक केंद्रातून प्रथम क्रमांक प्राप्त सर्व स्पर्धकांची तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आली असून या सर्व स्पर्धकांना प स मुरूड,शिक्षण विभाग या कार्यालयामार्फत भेटवस्तू देण्यात आली...प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मुरूड येथे उपस्थित असणाऱ्या सदर स्पर्धेमध्ये राजिप शाळा बोर्ली मराठी-प्रथम क्रमांक, राजिप शाळा चिकणी - द्वितीय क्रमांक,तसेच राजिप शाळा वळके -तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे...
