कोलाड (श्याम लोखंडे)
श्रावण महिन्यात कृष्ण पक्ष पिठोरी अमावस्या अमावस्येला श्रावण ,पोळा तसेच दर्श अमावस्या असे संमबोधन
रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागात भारतीय हिंदू संस्कृतीत समजली जाणारी श्रावण मास महिन्यातील पिठोरी अमावस्या हा सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...यावेळी पंचांगानुसार पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते...तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील काही ठिकाणी साजरा केला जातो...तर पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात...संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत -१ - पूजा करत हा सण उत्सव खांब देवकान्हे विभागात मोठ्या उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला...
चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा आराधना करून आमवस्सेला केले महत्वपूर्ण पूजन
या आमवस्सेला महत्वपूर्ण पूजन या व्रत सुवासिनी स्त्रिया करतात...या दिवशी उपवास करुन सायंकाळी स्नान करतात... घरातील मुलांस अगर मुलीस खीरपुरीचे वायन देतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. या दिवशी खीर-पुरी, पुरणपोळी, साटोरी, असे पदार्थ तयार करुन नैवेद्य दाखवतात तसेच या दिवशी ६४ देवींची पूजा आराधना केली जाते... आपल्या कुटुंबाची आणि मुलांच्या समृद्धीची प्रार्थना केली जाते...त्यांना दीर्घायू प्राप्त हो अशी प्रार्थना मनोभावे स्त्रिया करतात...
तालुक्यातील विभागात हा उत्सव पिठोरी अमावास्या गौरी सन म्हणून मोठया उत्साहात सादर
तालुक्यातील खांब देवकान्हे विभागातील खांब, वैजेनाथ, घेरासुरगड,मुठवळी, शिरवली, पुगाव, नडवली, तळवलीतर्फे अष्टमी, चिल्हे,धानकान्हे, बाहे , देवकान्हे सह विभागात हा उत्सव पिठोरी अमावास्या गौरी सन म्हणून मोठया उत्साहात आणि आनंदात धार्मिक आणि आध्यात्मिक हरिपाठ भजन गायन करत तसेच महीला वर्गात फेऱ्यांचा नाच गाणी गात असतात..तर विविध खालु बाजा वाजवत पुरुष मंडळी भंडारी मीबाल्या नाच गाणी म्हणत आनंद सादर करतात...
