कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
श्री गणेश सत्संग मंडळ तळवळी तर्फे दिवाळी येथे ह.भ.प.नंदू महाराज तेलंगे यांचे कुशल नेतृत्व
रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली तर्फे दिवाळी येथे श्री विठ्ठलाच्या कृपाप्रसादे, संतश्रेष्ठ ज्ञानराज माऊली, संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज आदी करून सकल संताच्या कृपाआशिर्वादाने, गुरु नाम गुरु प्राः तस्मरणीय सद्गुरू स्वामी गणेशनाथ बाबांच्या कृपाछत्राखाली, सर्व साधकांचे श्रध्दास्थान सद्गुरू स्वामी हरिश्चंद्र महाराज तथा अप्पांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या अधिपत्याखाली आणि आशिर्वादाने सद्गुरू आप्पांनी २५ वर्षापूर्वी सदर संप्रदाय उपक्रमाचा मार्ग दाखविला तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रतिवर्षी श्रावण व दर तिन वर्षांनी येणार पुरुषोत्तममास (आधिक मास) महीन्यातील उपक्रम श्री गणेश सत्संग मंडळ तळवळी तर्फे दिवाळी येथे ह.भ.प.नंदू महाराज तेलंगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली त्यांच्या निवास्थानी श्रीमत् भागवत ग्रंथाचे वाचन आयोजीत करण्यात आले होते.. त्यांची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली...
श्रावण मास महिना भारतीय हिंदू संस्कृतीत पवित्र महिना याचा सद्भक्तांनी घेतला लाभ
मार्ग दाऊनी गेले आधी। दयानीधी संत ते । तेणेची पंथे चालो जाता । न पडे गुंता कोठे काही | संतांनी दाखविलेल्या मार्गाने चालल्यास अत्यंतीक दुःखाची निवृत्ती । परमानंदाची प्राप्ती ॥ होत असते...या अनुषंगाने अधिक मास आणि त्याला जोडून आलेला श्रावण मास महिना भारतीय हिंदू संस्कृतीत पवित्र महिना याचे सद्भक्तांना लाभ मिळावा यासाठी दि.१८ जुलै २०२३ ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत जवळपास ५८ दिवस हा ग्रंथ वाचन सोहळा आयोजित करण्यात आला होता.. याचे वाचन हभप नंदु महाराज तेलंगे यांनी करत त्यातून श्रवण दात्याना उत्तम असे मार्गदर्शन यातून केले...
शंभर वर्षांची आध्यत्मिक तथा धार्मिक आणि वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या तेलंगे परिवाराचे मार्गदर्शन
गेली शंभर वर्षांची आध्यत्मिक तथा धार्मिक आणि वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या तेलंगे परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ५८ दिवस अविरतपणे आयोजीत करण्यात आलेल्या श्रीमत् भागवत ग्रंथ वाचनची सांगता शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी विवीध कार्यक्रमांनी आयोजीत करण्यात आली... तर मंगळवारी १८ जुलै रोजी अधिक श्रावण पुरुषोत्तममास प्रारंभ सकाळी ०८.०० वा. या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन, कलश स्थापना, ध्वजरोहन ०९.०० वा. अधिकमास महात्म्य पुर्ण ग्रंथवाचन सलग ५८ दिवस दररोज रात्री ९.३० ते १०.०० " राम कृष्ण हरि " या दिव्य नामाचा सामुदायिक जप दररोज दुपारनंतर ३ ते ५.३० वाचन करण्यात आले...तर यादरम्यान श्रीमद् एकनाथी भागवत ग्रंथाचे वाचन सलग ५८ दिवस सकाळी केले सहस्त्र बिल्वदळ वहाण्याचा सामुदायिक कार्यक्रम, सहस्त्र तुळशीदल वहाण्याचा सामुदायिक कार्यक्रम, पौर्णिमा - ब्रम्हवृंदास दिपदान करण्याचा कार्यक्रम, सहस्त्र दुर्वांकुर वहाण्याचा सामुदायिक कार्यक्रम (संकष्टी चतुर्थी),तद्नंतर पुन्हा सहस्त्र तुळशीदल वहाण्याचा सामुदायिक कार्यक्रम (शुध्द एकादशी) सहस्त्र बिल्वदळ वहाण्याचा सामुदायिक कार्यक्रम, तसेच जानकीबाई परशुराम तेलंगे या मातोश्रीचा ९ वा पुण्यस्मरण सोहळा निमित्ताने सामुदायिक नाम जप सायंकाळी हरिपाठ - सायंकाळी ०६ ते ०७ प्रवचन रात्रौ महाप्रसाद अशा सांप्रदायिक कार्यक्रमांनी केले...
रायगड भूषण खांब पंचक्रोशीचे आधिस्थान हभप मारुती महाराज कोल्हटकर यांचे सुश्राव्य प्रवचन रुपी सेवा
तसेच ३१ ऑगस्ट ते ०७ सप्टेंबर सालाबादप्रमाणे श्री हनुमान मंदिरात (श्रावण सप्ताह ) श्री संत श्रेष्ठ जगतगुरु संत तुकाराम संगीत गाथा पारायण सोहळा सकाळी ९ ते १ व दुपारनंतर ३ ते ६ संगीतातून करण्यात आले...०३/०९/२०२३ रविवार (श्रावण संकष्टी चतुर्थी) सहस्त्र दुर्वांकुर वहाण्याचा सामुदायिक कार्यक्रम, त्याचबरोबर गाथा पारायण सांगता ११ ते २ दिंडी नगर प्रदक्षिणा करण्यात आली..तद्नंतर शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी (श्रावण आमावस्या) श्री क्षेत्र उध्दर - पाली येथे तिर्थ स्नान पहाटे ०४.०० वा. - (दैनंदिन येणाऱ्या साधकांकरीता) (श्रावण) श्रीमद् भागवत ग्रंथ वाचन सांगता दुपारी १ ते २ - महाप्रसाद तसेच या प्रसंगी रायगड भूषण खांब पंचक्रोशीचे आधिस्थान हभप मारुती महाराज कोल्हटकर यांचे सुश्राव्य प्रवचन रुपी सेवा करत सायं. ७ ते ८ - दिपोत्सव दिंडी (नगर प्रदक्षिणा) करत मोठया उत्साहात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...
अध्यात्मिक,धार्मिक,सांप्रदायिक कार्यक्रमाला ५८ दिवस भाविकांचा तसेच श्रवनदात्यांचा उत्स्फर्त प्रतिसाद
तसेच हभप नंदू महाराज तेलंगे यांनी आयोजित करण्यात असलेल्या या अध्यात्मिक धार्मिक आणि सांप्रदायिक कार्यक्रमाला गेली ५८ दिवस भाविकांनी तसेच श्रवनदात्यानी उत्स्फर्त प्रतिसाद देत लाभ घेतला..तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेलंगे परिवार आणि तळवली ग्रामस्थ तसेच वारकरी संप्रदाय मंडळींनी अथक परिश्रम घेतले...
