कोलाड (श्याम लोखंडे)
श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी नाभिक समाज रोहा तालुका उपाध्यक्ष दिलीप शंकर मोहितेंच्या निवासस्थानी साजरी
सालाहाबादप्रमाणे दरवर्षी श्रावण कृष्ण द्वादशीला नाभिक समाजाचे आराध्य दैवत तसेच श्री. संत सेना महाराज यांची पुण्यतिथी खांब येथील नाभिक समाज रोहा तालुका उपाध्यक्ष दिलीप शंकर मोहिते रा.खांब यांच्या निवासस्थानी सोमवारी ११सप्टेंबर रोजी मोठया उत्साह वातावरणात व विवीध आध्यत्मिक आणि धार्मिक कार्यक्रमानी साजरी करण्यात आली यावेळी बहुसंख्येने खांब विभागीय नाभिक समाज महीला वर्ग आदी ग्रामस्थ उपस्थित होते...
नाभिक समाज व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे घेतले दर्शन
संत परंपरेचा तसेच वारकरी संप्रदयाचा वारसा लाभलेल्या श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीत तसेच कोकण वाशियांचे श्रद्धास्थान वै.गुरुवर्य अलिबाकर महाराज, वै.गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे, वै.गुरुवर्य धोंडू बाबा कोल्हटकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र खांब पंचक्रोशी तसेच आध्यत्मिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या खांब येथे श्री संत सेना महाराज यांचा पुणयतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...यावेळी खांब विभागीय नाभिक समाज तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोहिते यांच्या निवास्थानी भेट देऊन श्री संत सेना महाराज यांचे दर्शन घेतले...
दिलीप मोहिते व राहुल मोहिते यांनी नाभिक समाज बांधव महिला वर्गाला संघटित राहण्याचे केले मार्गदर्शन
खांब विभाग नाभिक समाजाच्या वतीने तसेच खांब विभाग नाभिक समाज अध्यक्ष राहूल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली...यावेळी श्री .संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.नंदकुमार महाराज तेलंगे रा. तळवली - कोलाड यांचे सुश्राव्य प्रवचनरुपी सेवा संपन्न झाली. याप्रसंगी ह.भ.प . प्रकाश महाराज थिटे , राजेंद्र मोहिते , विष्णू मोहिते , विवेक मोहिते , दिपक खराडे ,प्रमोद मोहिते , जयेश मोहिते , संतोष मोहिते , रोहन मोहिते , कैलास मोहिते, साहिल मोहिते ,अर्णव मोहिते , विश्वास मोहिते, प्रथमेश मोहिते, देवांश मोहिते व महिला वर्ग उपस्थित होते.श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त दिलीप मोहिते व राहुल मोहिते यांनी सर्व नाभिक समाज बांधव व महिला वर्गाला संघटित राहण्याचे मार्गदर्शन यावेळी केले...
