कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
लहान थोर मंडळी भक्तगणांनी आवडत्या बाप्पाला मोठया भक्तिमय वातावरणात दिला निरोप
रोहा तालुक्यात गेली तीन दिवस सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेतही तितक्याच भावपुर्ण वातावरणात दिडदिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले...तालुक्यातील मौजे चिल्हे येथे मंगळवारी बाप्पांच्या आगमनापासून ते दीड दिवसांच्या विसर्जनातही मुसळधारेसह सुरू असलेल्या पावसामुळे भक्तगणांचा तसेच नाच गाणे करणारे व भजनी मंडळी यांचा थोडा हिरमोड झाला होता... तरीही ढोल, ताशांच्या व खालू बाजा आणी टाळ, मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या उंदीर मामा की जय म्हणत येथील लहान थोर मंडळी भक्तगणांनी अवडत्या बाप्पाला मोठया भक्तिमय वातावरणात निरोप दिला...यावेळी गावातील लहान थोर तसेच महीला भगिनी यांनी विसर्जन स्थळांवार मोठी गर्दी करत सर्वाना सुखी ठेव म्हणत भक्तीमय वातावरणात निरोप दिला...
गावातील व विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था आणी विद्युत रोषणाई
गणपती विसर्जनासाठी आठ दहा दिवसांपूर्वीच येथिल ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गणरायांचे आगमन होणार असल्याने गावातील व विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था आणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती...तर विशेष वीसर्जन घाटांची स्वच्छता करण्यात आली होती...तर गेली दोन दिवस पावसाचा जोर होता त्यामुळे लहान थोर ग्रामस्थ नागरीक माता भगिनींचा हिरेमुड परंतू तसेच दुपारी ४ वाजल्यानंतर वाजत गाजत, काहीतर गुलाल उधळत, लेझिम, टाळ मॄदुंग, ढोल ताशाच्या गजरात श्री गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती...एका मागुन एक घरगुती गणपती विसर्जनासाठी नजिकच्या तलाव ठिकाणी निघाले होते...
गजर करीत तलावात भावपुर्ण आणि भक्तीमय वातावरणात गणरायांचे विसर्जन
भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या उंदीर मामा की जय असे गजर करीत तलावात भावपुर्ण आणि भक्तीमय वातावरणात गणरायांचे विसर्जन केले तद्नंतर गड्यांनो हळू हळू चला, वाचे गजानंद बोला असे भजन गात पुन्हा घरी परतता....

