कोलाड प्रतिनिधी:(श्याम लोखंडे)
२५४ लक्ष्मी गौराईचे होणार आगमन.
कोलाड खांब विभागातील दीड दिवसांच्या बाप्पांचे दिनांक २०/९/२०२३रोजी बुधवारी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोष करीत ढोल ताशांच्या तसेच टाळ मृदंगाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत भावपुर्ण निरोप देत घरगुती गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले... मंगळवारी बाप्पांच्या आगमनापासून ते दीड दिवसांच्या विसर्जनातही मुसळधारेसह सुरू असलेल्या पावसामुळे भक्तगणांचा थोडा हिरमोड झाला होता... तरीही ढोल, ताशांच्या आणी टाळ, मृदुंगाच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत भक्तगणांनी आवडत्या बाप्पाला निरोप दिला...यावेळी विसर्जन स्थळांवार सर्वत्र मोठी गर्दी दिसून येत आली...कोलाड विभागात मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी एकूण १९६९ घरगुती गणपती बाप्पांचे आगमन झाले होते... तर घरगुती खाजगी ७८० दिड दिवसांच्या बाप्पांचे बुधवारी भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले आले असून उद्या गुरुवारी २१ सप्टेंबर रोजी या विभागात एकूण २५४ लक्ष्मी गौराईचे घरगुती आगमन होणार आहे... ११३८ पाच दिवसांचे १ सात दिवसांचा ४० दहा दिवसांचे व ९ सार्व. असे एकूण १९६९ गणपती बाप्पांचे कोलाड आणि परिसरातील गाव वस्ती वांड्यांवर मोठया उत्साहाने तसेच भक्तीमय वातावरणात कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करत आगमन होणार असून २५४ लक्ष्मी गौराईच ही आगमन होणार आहे...
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत गणेश भक्तगणांनी लाडक्या बाप्पाला दिला निरोप
रोहा तालुक्यातील कोलाड विभागात भावपुर्ण वातावरणात दिड दिवसांच्या घरगूती ७८० बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. कोलाड पोलीस स्टेशन हद्दीत सार्व ९ व खाजगी घरगुती १९६० असे एकूण १९६९ गणेशमूर्तींचे मंगळवारी मोठ्या उत्साहात बाप्पांचे आगमन झाले... तर बुधवारी ढोल, ताशांच्या आणी टाळ, मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत गणेश भक्तगणांनी आपल्या लाडक्या बाप्पाला व दीड दिवसांनी ७८० बाप्पांना निरोप दिला...
कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करत वाजत गाजत श्री गणरायांचे विसर्जन
यावेळी या विभाग परिसरातील गाव ग्रामस्थ नागरिकांनी गणपतीपूर्वीच वीसर्जन घाट व जाणारा मार्ग तसेच तलाव व नदी परिसर स्वच्छता करण्यात आली होती..गेली दोन दिवस पावसाच्या सरिवर सरी येत असताना ही दुपारी चार वाजल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करत वाजत गाजत तर काही गुलाल उधळत, लेझिम, टाळ मृदुंग, ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत श्री गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती... एका मागुन एक घरगुती गणपती विसर्जनासाठी आपल्या परिसरातील नदी किनारी व तलाव ठिकाणी निघाले होते. तत्पुर्वी कोलाड पोलिस प्रशासनाच्यावतीने कायदा सुव्यवस्थेचा पालन म्हणून दुपारपासूनच कोलाड विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे रहावेत यासाठी गस्त घालण्यात आली होती...
कोलाड पोलीस स्टेशन हद्द व परिसर एकुण दिडदिवसांच्या ७८०बाप्पांचे विसर्जन कोलाड पोनि अजित साबळेकडून माहीती...
भर पावसातही भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे गजर करीत सुतारवाडी,कोलाड,खांब परिसरातील तलाव, कुंडलिका नदीपात्र,व महीसदरा किनारी भावपुर्ण आणि भक्तीमय वातावरणात गणरायांचे विसर्जन केले... तर काही ठिकाणी पावसामुळे विसर्जन करण्यात विलंब झाला परंतू यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलिसांनी विसर्जन मार्गावर आणि नदी किनारी तसेच मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंड ते तीसे भुवनपर्यंत चोख बंदोबस्त ठेवले होते...कोलाड पोलीस स्टेशन हद्दीतील हद्दीतील व परिसरातील दिडदिवसांच्या एकुण ७८० बाप्पांचे विसर्जन करण्यात आले असल्याची माहीती कोलाड पोलिस निरीक्षक अजित साबळे यांनी दिली...
परिसरात दीड दिवसाचे गणपती खाजगी ७८०, पाच दिवसाचे खाजगी ११३८ सात दिवसांचा १ तर दहा दिवसांचे 40 घरगुती गणपती आहेत तर ९ सार्वजनिक मंडळाचे गणपती असून आज गुरूवारी २५४ गौरींचे आगमन होणार आहे...गणेश उत्सव अनुषंगाने कोलाड पोलिस ठाणे हद्दीत पुरविण्यात आलेला बंदोबस्त दोन पोलिस अधिकारी व एकतीस पोलिस कर्मचारी दोन पेट्रोलिंग साठी त्यांच बरोबर मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये याची दक्षता घेत ही पथक विविध ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती कोलाड पोलिस सूत्रांकडून मिळाली...
