कोलाड प्रतिनिधी:(श्याम लोखंडे)
खांब परिसरातील गावांशी तसेच सर्वसामान्यांशी सलोख्याचे नातं असल्याने तटकरे कुटुंबाला येथील विकासात हातभार लावण्याची संधी वेळोवेळी मिळत आहे... नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा. ग. पोटफोडे विद्यालयात चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने त्यांना शिक्षणाबरोबरच आरोग्य आणि त्यांचा शारीरिक विकासही तेवढाच महत्वाचा असल्याचे प्रतिपादन आ.अदिती तटकरे यांनी खांब येथील कार्यक्रमात केले...
रायगडचे खा. सुनील तटकरेंच्या कृपाशीर्वादाने तसेच ओ एन जी सी सिएसआर अंतर्गत सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग रायगड मार्फत रविवार दि २० ऑ.रोजी खांब येथील श्री रा. ग. पोटफोडे विद्यालय व कै. द. ग. तटकरे कनिष्ठ महाविद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी शौचालय बांधण्यात येत असून त्याचे भूमिपूजन राज्याचा महीला व बाळ विकास कॅबिनेट मंत्री आ.अदिती तटकरेंच्या हस्ते करण्यात आले...
मंचावर न शि प्र मं खांब संस्थेचे अध्यक्ष तथा गोवे ग्राम पंचायतीचे सरपंच महेंद्र पोटफोडे,खांब विभागीय ज्येष्ठ नेते रामचंद्र चितळकर,नारायणराव धनवी,कोलाड विभागीय पोलीस निरिक्षक ए.साबळे,बाळकृष्ण बामणे,संचालक धनाजी लोखंडे,धोंडू कचरे,राम मरवडे, वसंत मरवडे, सुप्रिया जेधे अध्यक्षा ओ एन जी सी स्वयंसेवी संस्था अलिबाग, इंजिनिअर आदित्य घरत,माजी पंचायत समिती सदस्या सौ विनाताई चितळकर , जिल्हा परिषद गणाचे अध्यक्ष नरेंद्र जाधव, पंचायत गणाचे अध्यक्ष मनोज शिर्के,खांब सरपंचा सौ कांचन मोहिते, पुगावं उपसरपंचा सौ नीलम कळमकर,मानसी चितळकर , सुरेखा पारठे देवकान्हे सरपंच वसंत भोईर, तळवली सरपंच रविंद्र मरवडे, उपसरपंच संदीप महाडीक, सहसंस्थेचे संचालक,शिक्षक, तसेच ग्रामस्थ आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते...
यावेळी बोलताना आ.अदिती तटकरे म्हणाल्या की शाळेच्या इमारत बांधकाम विकासाबरोबर येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांचा आरोग्य आणि शारीरिक विकास झाला पाहिजे.. शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक वर्गाची गुण कौशल्यता आहे त्यामुळे यावर या विद्यालयाच्या विविध प्रकारच्या समस्येवर अधिक भर देणार असून रायगड जिल्हयातील जनतेचे तटकरे कुटुंबावरील प्रेम आणि सर्वांच्या आशीर्वादाने मिळाले पुन्हा मंत्री पदभार स्वीकारून प्रथमच या शाळेतील विविध कामांचा भूमिपूजन करण्याची संधी मिळाली.. त्याचबरोबर २०ऑगस्ट रविवार हा सुट्टीचा दिवस असताना विद्यार्थी शाळेचा गणवेश परिधान करून आल्याने विद्यार्थी वर्गाचे कौतुक केले..तसेच विविध विकास कामांबाबत संचालक मंडल तसेच शिक्षकांनी केलेल्या निवेदन मागणीनुसार येत्या कालावधीत मेन रोड पासून शाळेला जोडला गेलेला अंतर्गत रस्ता व सुसज्य असे सभागृह उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन या प्रसंगी दिले...
यावेळी ज्येष्ठ नागरिक रामचंद्र चितलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की आमच्या खांब विभागात सदैव तटकरे कुटुंबाचे प्रेम आहे तसेच अनेक विकास कामे केली आहेत या शाळेची मोडकळीस आलेली इमारतींना खऱ्या अर्थाने तटकरे साहेबांनी विविध विकास कामांअंतर्गत निधी देऊन या इमारतींच चित्र बदललेले वैभव पहावयास मिळत आहे...तसेच अधिक कामांचा पाढा वाचत उर्वरित कामांची मागणी केली...संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की संस्थेला विविध निधी खासदार तटकरे साहेबांनी दिल्याने हे वैभव नावारूपाला आले आहे... शाळेसाठी प्रथमच इमारतीसाठी निधी,संरक्षण भिंत ,क्रीडा मैदान तसेच श्रमिक विद्यालय चिल्हे हायस्कूलला संरक्षण भिंत मंजूर करून दिले आहेत...खांब येथे ओ एन जी सी सी एस आर मधून विद्यार्थी वर्गासाठी नव्याने शौचालय इमारतीचे भूमीपूजन ना.अदिती ताई तटकरे यांनी केले...व शाळेसाठी अधिक विकास कामांची मागणी केली...
आ.अदिती तटकरे यांचा विद्यालयातील सर्व शिक्षीका भगिनींनी औक्षण व विद्यार्थ्यांकडून पुष्पवृष्टी करून हा आनंदमय सोहळा पार पडला...कार्यक्रमाचे सूत्र संचालन तुपकर सर तर कार्यक्रमांचे प्रास्तविक प्राचार्य सुरेश जंगम यांनी केले...कार्यक्रमाची सुरवात भूमिपूजन स्वागत गीताने करण्यात आली...दुसऱ्यांदा मंत्री आणि प्रथम या हायस्कूलमध्ये कार्यक्रमानिमित्ताने आल्या असल्याने त्यांचे स्वागत ग्राम पंचायत खांब, नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब,ग्राम पंचायत तळवली,बाहे ग्रामस्थ,तसेच रा ग पोटफोडे विद्यालय ,श्रमिक विद्यालय चिल्हे व द न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी यांच्या वतीने करण्यात आले...आभार प्रदर्शन म्हात्रे सरांनी केले...याची सांगता अल्पोहार देऊन करण्यात आली...
