कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
डॉ.राजपूत व डॉ.धर्मपाठक यांच्याकडून महिला रुग्णांना विविध आजारांवर मूलभूत सुविधा होणार उपलब्ध
रोहा तालुक्यातील आंबेवाडी नाका येथील गिताई हॉस्पिटल शेजारी शनिवारी १९ ऑगस्ट २०२३ रोजी तेजोमय मेडिकल अँड जनरल स्टोअर्स व आनंदीबाई हॉस्पिटलचे उद्धघाटन महिला व बाळ कल्याणमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभेहस्ते करण्यात आले...यावेळी महिला व बाळ कल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मढवी कुटूंबाकडून चांगल्या प्रकारचे मेडिकल व आंनदीबाई हॉस्पिटल याची चांगल्या प्रकारची सुविधा येथील रुग्ण नागरिकांना उपलब्ध करून देत आहेत... खरं तर आपल्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र असेल प्राव्हेट प्रॅक्टिस करणारे अनेक सुविधा असतील...रोहामध्ये अनेक सुविधा असतील परंतु मला विशेष आनंद आहे कि आंबेवाडी नाक्यावर डॉ. राजपूत व डॉ. धर्मपाठक यांच्याकडून महिला रुग्णांना त्यांच्या विविध आजारांवर त्यांना चांगल्या प्रकारची मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहे...
१५ ऑ पासुन रक्षाबंधनपर्यंत आरोग्य सुविधा उपक्रम अंगणवाडी सेविका व मदतनीससाठी मेडिकल शिबिर करणार आयोजित
महिलांना अनेक प्रकारचे त्रास असतात ते महिलांना लक्षात येत नाही... या हॉस्पिटलमुळे महिलांना जास्त फायदा होणार असल्याचे महिला व बाळकल्याण विभागाची जबाबदारी स्विकारत असतांना आम्ही यावर्षी १५ ऑगस्टपासून रक्षाबंधनपर्यंत आंनदीबाई आरोग्य सुविधा उपक्रम हाती घेऊन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी मेडिकल शिबिर आयोजित करीत आहोत... तर पुढच्या वर्षी अंगणवाडी सेविकांच्या कुटूंबाकरिता सुविधा उपलब्ध करून देणार आहोत...याचप्रमाणे मढवी कुटुंबाकडून सुरु करण्यात आलेल्या मेडिकल सेवा सुविधाचा ही लाभ घेण्यात यावा असे मनोगत यावेळी शेवटी आदिती तटकरे यांनी व्यक्त केले...
कोलाड विभागातील असंख्य कार्यकर्ते व महिला वर्ग, बहुसंख्येने उपस्थित
यावेळी रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रितम पाटील, आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, उपसरपंच कुमार लोखंडे, जेष्ठ कार्यकर्ते रामचंद्र चितळकर,कोलाडचे उपनिरीक्षक अजित साबळे, युवा कार्यकर्ते राकेश शिंदे,संजय राजिवले, महादेव धसाडे, जगन्नाथ धनावडे,दिलीप पाबरेकर, संजय मांडलुस्कर,कोलाड विभागातील असंख्य कार्यकर्ते व महिला वर्ग, बहुसंख्येने उपस्थित होते...
