कोलाड. प्रतिनिधी: (श्याम लोखंडे)
रायगड जिल्हा परिषद चिल्हे येथे शाळेचा ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम लक्ष्मण महाडीक यांच्या हस्ते करण्यात आले...यावेळी तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीचे सरपंच रविंद्र मरवडे, उपसरपंच संदीप महाडीक, सदस्य दयाराम मरवडे,सौ अनघा खांडेकर,सौ सुकेशनी महाडिक, पोलिस पाटील गणेश महाडिक,गाव कमिटीचे अध्यक्ष तुकाराम कोंडे, खजिनदार अनंत लोखंडे, सुरेश महाडिक,सनी खांडेकर, स्वप्नील महाडिक, शाळेचे मुख्याध्यापक शरद पवार, सह शिक्षीका सोनाली सकपाळ, अंगणवाडी सेविका सुनीता लोखंडे, भारती शिंदे,आदी आजी, माजी, विदयार्थी तसेच पालक ग्रामस्थ महीला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते...
विद्यार्थ्यांनी गायलेले गीत आणि भाषण ऐकून उपस्थीत पाहुण्यांनी केले कौतुक
देशाच्या स्वतंत्र अमृतमहोत्सव म्हणून येथील उपसरपंच संदीप महाडीक, सदस्या सौ अनघा खांडेकर, सौ सुकेशनी महाडिक,यांनी शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना स्व खर्चातून शालेय गणेश वाटप केले तसेच विविध शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले. मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरपंच रविंद्र मरवडे, शालेय व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष तुकाराम महाडिक,मंडळाचे अध्यक्ष सनी खांडेकर, स्वप्नील महाडिक,शाळेच्या शिक्षीका सोनाली सकपाळ, यांनी आजी माजी उपस्थीत विद्यार्थि वर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले तर येथील विद्यार्थ्यांनी आपली विवीध कला सादर करत मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेतून स्वतंत्र दिनाचे भाषण करत देशभक्तीपर गीतांचे गायन करून उपस्थीत मान्यवरांना मंत्रमुग्ध केले तर विद्यार्थ्यांनी गायलेले गीत आणि भाषण ऐकून उपस्थीत पाहुण्यांनी त्याचे कौतुक केले...
सूत्रसंचालन मुख्याध्यापक शरद गोविंद पवार यांनी उपस्थितचे मानले मनःपूर्वक आभार मानले...
उस्पूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी निपुण भारत प्रतिज्ञा घेण्यात आली... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक शरद गोविंद पवार यांनी केले व शेवटी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम महाडीक यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, पालक व आजी-माजी विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले... आणि पाहुण्यांनी आणलेल्या खाऊचे( बिस्किट, चॉकलेट, आलपोहर ) वाटप करण्यात आले...तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा चिल्हे शाळेमध्ये भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला...
