दिनांक १६ /८ महाड वार्ताहर
समाजात उल्लेखनिय काम करीत असणाऱ्या व्यक्तींना संघटने तर्फे समाज भुषण पुरस्कारनी सन्मानित
सकल मराठा सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष श्री आनंद सरवणकर साहेब व अशोक धनावडे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे साहेब यांच्या मार्गर्शनानुसार समाजात उल्लेखनिय काम करीत असणाऱ्या व्यक्तींना संघटने तर्फे समाज भुषण पुरस्कारनी सन्मानित करण्यात येतो या वर्षी रायगडचा बुलंद आवाज असणारे पत्रकार असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री मनोज खांबे साहेब, आगर व्यवस्थापक श्री शिवाजी जाधव साहेब,निवारा वृध्दाश्रमचे अध्यक्ष श्री अनिकेत तांबे, समाजसेवक श्री परेश घोलप साहेब यांना संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले..
श्री महेंद्र धामणसे यांच्या हस्ते करण्यातआले सन्मानित
या वेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष श्री मनोज धामणसे साहेब,महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष श्री कमलेश पवार साहेब, कोकण विभाग कार्याध्यक्ष श्री निलेश तळवटकर साहेब, रायगड जिल्हा अध्यक्ष श्री गणेश पवार साहेब, जिल्हा सचिव हरीश पवार साहेब, तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर धनावडे साहेब, संपर्क प्रमुख दिपक साळुंके साहेब, जिल्हा युवा अध्यक्ष श्री प्रशांत जाधव साहेब व पदाधिकारी उपस्थित होते..
