नेरूळ प्रतिनिधी (जान्हवी भोईर)
दिनांक २३ ऑगस्ट ::नेरूळमध्ये सारसोळे गाव सेक्टर 6 या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे...याठिकाणी सेक्टर सहा मधील तुळशी भवन फ्लॅट नंबर 313 या इमारतीमधील सी विंग मधले स्लॅप कोसळल्यामुळे इमारतीचे तीन मजले खाली आले... यावेळी घटनास्थळी फायर ब्रिगेड व पोलीस प्रशासन तात्काळ दाखल झाले असून त्यांच्या माध्यमातून मदत कार्य सुरू करण्यात आले... या दुर्घटनेमुळे.इमारतीची अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ...या घटनेमध्ये पाच ते सहा रहिवाशी गंभीर जखमी झाले असून दोन रहिवाशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे... या दुर्घटनेमधील गंभीर अवस्थेमध्ये असणाऱ्या रुग्णांना डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले... तसेच फायर ब्रिगेडचे अधिकारी व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून येथील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे तसेच संपूर्ण इमारत खाली करण्यात आली...
