महाराष्ट्र वेदभुमी

चांडगाव येथील विकास कामे ग्रामपंचायतच्या सदस्यांमुळेच थांबल्याचे ग्रामसभेत उघड!

 


रोहा प्रतिनिधी :शहानवाज मुकादम

ठेकेदाराची नेमणूक शासनास दाखवून फसवणूक करीत असल्याचे ग्रामसभेत ग्रामसेवकानी केले उघड

तालुक्यातील खैरेखुर्द ग्रामपंचायत कार्यालयात दि:२२/८/२०२३/रोजी  ग्रामसभेत १५व्या वित्त आयोग निधीतील कामे ग्रामपंचायत सदस्यांकडूनच होतात मात्र ठेकेदाराची नेमणूक शासनास दाखवून फसवणूक करीत असल्याचे ग्रामसभेत ग्रामसेवक यानेच केले उघड...तंटामुक्त अध्यक्ष श्री अनिल साळावकर यांनी आयत्यावेळच्या विषयात सरपंच यांच्याकडून परवानगी घेऊन चांडगाव येथील विकास कामे का होत नाही?ग्रामस्थांकडून केलेल्या तक्रारीचे कोणतेही उत्तर ग्रामपंचायत कडून का मिळत नाही? अशी विचारणा केली...त्यावर चांडगाव येथील १५ व्या वित्त आयोग निधीतील कामे सदस्यांमुलळेच थांबली असल्याचे...ग्रामसेवक श्री आप्पासाहेब कांबळे यांनी सांगितले आहे...

१५ दिवसात सदस्यांकडून सुरु न झाल्यास ग्रामसेवक सरपंच स्वतः कामे सुरु करणार 

तंटामुक्त अध्यक्ष श्री साळावकर यांनी चांडगावचे सदस्यांमुळेच विकास कामे होत नसतील तर ग्रामसेवक यांच्याकडून लेखी पत्राची मागणी केली होती..त्यावर चांडगाव येथील कामे येत्या १५ दिवसात सदस्यांकडून सुरु न झाल्यास आम्ही ग्रामसेवक सरपंच स्वतःच हे कामे सुरु करु असे ग्रामसेवक यांनी तंटामुक्त अध्यक्ष श्री अनिल साळावकर यांना ग्रामसभेत उत्तर देत कबुल केले...माजी सरपंच देवळे म्हणाले १५ वा वित्त आयोग निधीतील कामे करण्यास पेपरला निविदा देऊन ठेकेदाराची नेमणूक केल्यावर सदस्यांमुळेच विकास कामे कशी थांबली? ठेकेदार काम करीत नसेल तर ठेकेदार रद्द करून नवीन ठेकेदाराची निवड करावी...त्यावर ग्रामसेवक म्हणाले ग्रामपंचायतचे सदस्यच हे कामे करतात हे पुर्वीपासुन होत आहे...ग्रामसेवक यांच्याकडूनच ग्रामसभेत उघड झाल्याने ग्रामपंचायतकडुन ठेकेदाराची निवड म्हणजेच शासनाची फसवणूक व दिशाभूल होत असल्याचे ग्रामसभेत उघड झाले आहे...ग्रामपंचायत खैरेखुर्द करुन झालेले विकास कामे,अपुर्ण कामे,तक्रारदाराने केलेल्या तक्रारी,ग्रामसभेचे ठराव या अनेक विषयांची वरिष्ठांकडून दखल घेऊन खैरेखुर्द ग्रामपंचायतची दप्तर तपासणी होण्याची मागणी तंटामुक्त अध्यक्ष श्री अनिल साळावकर,माजी सरपंच श्री देवळे व अनेक ग्रामस्थांकडून होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post