अलिबाग प्रतिनिधी (ओमकार नागावकर) :
माजी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश
मुरुड तालुक्यातील भाजप उपाध्यक्ष परेश किल्लेकरांसह अनेक कार्यकर्त्यांनी दि.२४ ऑगस्ट रोजी मुंबई शिवसेना भवन येथे माजी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला...
शिवसेना पक्षात आलेली जनता पुन्हा पक्ष बदलण्याचा निर्णय कधीच घेत नाही : रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे
रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी बोलताना सांगितले की, मुरूड तालुका भाजप उपाध्यक्ष परेश किल्लेकर यांनी आजपर्यंत भाजपात राहून अनेक समाजोपयोगी कामे केली...जनतेच्या तत्पर सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली... जनतेच्या हिताचे कार्यक्रम घेण्यात आले... असे असूनसुद्धा भाजप पक्षातून कुठे तरी गळचेपी होत असल्याकारणाने वारंवार हाती येणाऱ्या निराशेने पक्षातून राजीनामा देण्यात आला...परंतु शिवसेना प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रभावित होवून शिवसेना संघटनेत येण्याचा विचार केला... शिवसेनामध्ये येण्याचा निर्णय हा अत्यंत परिपूर्ण असून संघटनेचे पुढील भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे...येणाऱ्या काळात शिवसेना प्रमुख उध्दवजी ठाकरेच मुख्यमंत्री असतील तर रायगड जिल्ह्यातील खासदार, आमदार देखील शिवसेनेचाच असेल... शिवसेना पक्षात आलेली जनता पुन्हा पक्ष बदलण्याचा निर्णय कधीच घेत नाही कारण पक्ष जनतेसाठी कोणत्याही प्रसंगात खंबीरपणे पाठीशी उभा असतो असे बोलताना सांगितले..
पक्षप्रवेशाला अनेक पदाधिकारी उपस्थित
या पक्षप्रवेशाला माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, मुरुड तालुका संपर्कप्रमुख गजानन पाटिल, मुरुड तालुका प्रमुख नौशाद दळवी, दक्षिण रायगड संपर्क प्रमुख संजय कदम, युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य सुधीर ढाणे, अलिबाग मुरुड विधानसभा संपर्कप्रमुख अजय गोयजी, अलिबाग तालुका संपर्क प्रमुख उपकार खोत, माजी सभापती मुरुड पंचायत समिती चंद्रकांत मोहिते, विधानसभा अधिकारी युवासेना रुपेश रोटकर, मुरुड तालुका अधिकारी युवासेना विक्रांत कुबल, अलिबाग तालुका अधिकारी युवासेना गिरीश शेळके, शिवसेना ग्राहक संरक्षण रायगड जिल्हा संतोष ठाकूर, सुरेश झावरे व पदाधिकारी उपस्थित होते...
