कोलाड प्रतिनिधी श्याम लोखंडे
पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, रायगड प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आला निषेध
अलिबाग – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, रायगड प्रेस क्लबच्या वतीने निषेध करण्यात आला... या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी रायगड प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आली...रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे संघटक विजय मोकल यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी ११ वाजता पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेतली... यावेळी रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष मोहन जाधव, जेष्ठ पत्रकार मानसी चेऊलकर, बी एस कुलकर्णी, पद्माकर उभारे उपस्थित होते...
पत्रकार संदीप महाजन यांना स्थानिक आ. किशोर पाटील यांच्याकडून भर सभेत शिवीगाळ.. रस्त्यात अडवून लाथाबुक्यांनी मारहाण
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्याकडून भर सभेत शिवीगाळ करण्यात आली होती... यानंतरही आमदार पाटील यांनी आपल्या या वर्तनाचे समर्थन केले होते... हा प्रकार इथेच थांबला नाही.. तर आमदार पाटील यांच्या समर्थकांनी महाजन यांना रस्त्यात अडवून लाथाबुक्यांनी मारहाण केली... ज्यात ते गंभीर जखमी झाले आहेत...
आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
या घटनेची गंभीर दखल घेऊन आमदार किशोर पाटील आणि संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणारे त्यांचे समर्थक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून ठोस कारवाई करावी... अशी मागणी यावेळी करण्यात आली...
