कोलाड प्रतिनिधी श्याम लोखंडे
समाजसेवक कै जानू कोळी यांच्या स्मरणार्थ समाजरत्न पुरस्कार प्रदान
रोहा तालुक्यातील हेटवणे गावचे रहिवासी संतोष दत्ताराम निकम हे समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी तसेच समज बांधवासाठी विविध शासकीय योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे त्यांची ही तळमळ विचारात घेऊन रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने संतोष निकम यांना समाजसेवक कै. जानू कोळी यांच्या स्मरणार्थ समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला...
संतोष निकम यांचे विविध स्तरावरून अभिनंदन
संतोष निकम हे कोलाड कुणबी ग्रुप कमेटीचे सचिव आहेत...तसेच ते चिंचवली तर्फे दिवाळी ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष व हेटवणे येथील प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असे अनेक पदावर ते काम करीत असुन नेहमीच समाज हिताचे काम करीत आहेत... यावेळी नगरसेवक रत्नाकर उभारे, पाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राम पवार, महेश मोरे ,नगरसेविका लक्ष्मीताई जाधव, शंकर कोळी, राम जाधव, भिवा पवार,राम कोळी, मारुती पवार, इंदुताई पवार, ताराताई जाधव, शंकर कोळी, धर्मराज कोळी, महादेव कोळी,त्रिभुवन पवार,केतन पवार, मधुकर पवार,अनंता पवार, नामदेव जाधव,भास्कर पवार, स्वातीताई मोरे, काशीराम वाघमारे, येरद वन मित्र ग्रुपचे सर्व पदाधिकारी तसेच माणगाव तालुका आदिवासी कातकरी समाजसेवा संस्था जानू कोळी पुरस्कृत संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते...या पुरस्काराबद्दल संतोष निकम यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे...
