अलिबाग प्रतिनिधी - स्वाती जाधव: समुद्रकिनारी , निसर्ग सौंदर्य आणि मुंबई पुण्याच्या जवळीकतेमुळे अलिबागमध्ये मोठया संख्येने पर्यटक येतात.माञ अनेक पर्यटकांचा अलिबाग दौरा आजही वन-डे ट्रिपपुरताच मर्यादित असतो...
पर्यटकांचा मुक्काम वाढवून अलिबागच्या पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी समुद्रकिनारालगत आधुनिक ओशनँरियम उभारण्यात येत आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरपरिषद सभापती प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नातून साकारत असलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे...
या प्रकल्पाच्या कामाची प्रशांत नाईक यांनी पाहणी केली. यावेळी बांधकामाचा दर्जा,कामाची सद्यपरिस्थिती आणि पुढील नियोजनाचा आढावा घेण्यात आला.विशेष अनुदान योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी २०२४ मध्ये ६० कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. सध्या प्रकल्पाचे सुमारे ६०% टक्के काम पूर्ण झाले असून,मार्च २०२७ पर्यत ओशनँरियम सुरू करण्याचे नियोजन आहे...
या ओशनँरियमध्ये पर्यटकांना समुद्रातील विविध जलचर , सागरी जीवसृष्टी आणि जैवविविधतेचा आधुनिक पध्दतीने अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह विघार्थी आणि शैक्षणिक सहलींसाठीही हे आकर्षणाचे केंद्र ठरण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, ओशनँरियममुळे पर्यटकांचा अलिबागमधील मुक्काम वाढल्यास त्याचा फायदा स्थानिक हाँटेल व्यावसायिक.रेस्टाँरंट ,होमस्टे चालक आणि छोटया व्यावसायिकांनाही होऊ शकतो.त्यांमुळे हा प्रकल्प अलिबागच्या पर्यटनाला चालना देण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही महत्वाचा ठरणार आहे..
एकीकडे पारंपारिक पर्यटनस्थळे आणि समुद्रकिनारे, तर दुसरीकडे सागरी जीवसृष्टीचा आधुनिक अनुभव, अशा स्वरूपात विकसित होणारे हे ओशनँरियम अलिबागच्या पर्यटनाला नवी ओळख मिळवून देण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पर्यटकांना केवळ एक दिवसाची सहल न करता अलिबागमध्ये अधिक काळ घालविण्यासाठी हे नवे आकर्षण कितपत यशस्वी ठरते,याकडे लक्ष लागले आहे...
