महाराष्ट्र वेदभुमी

तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे अधिक गती मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

रोहा प्रतिनिधी (राकेश धुमाळ) : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलिकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता असलेला प्रदेश आहे... नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासातून सुमारे १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता व्यक्त केली आहे... या क्षमतेचा प्रभावी उपयोग करून मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजित, शाश्वत आणि जागतिक दर्जाचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय संस्थानासोबत भागीदारी करण्यास सुरुवात केली आहे... यातून तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे...

 सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत एमएमआरडीए आणि  टेमासेक, सुरबता ज्युरोंग व मॅपलट्री सिंगापूर यांच्यत सामजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त तथा रायगड - पेन ग्रोथ सेंटरचे अध्यक्ष पी.  वेलारूस, टेमासेक चे अध्यक्ष पीयूष गुप्ता, टेमासेक पोर्टफोलिओ  विकास प्रमुख (आशिया ऑपरेशन्स) दिनेश खन्ना, सुराबात ज्युरोंग चे प्रमुख अविनाश मिश्रा, मॅपलट्री चे वरिष्ट उपाध्यक्ष अजयकुमार सिंग, रायगड - पेन ग्रोथ सेंटरचे संचालक के. व्ही. ब्रम्हणी राव व संबंधित आधिकारी उपस्थित होते...

  मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागीदारीचे स्वागत केले असून मुंबई महानगर प्रदेशाच्या विस्तारासोबत भविष्यात तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई या नव्या विकास केंद्रांचा उदय होणार आहे... नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, रायगड - पेन ग्रोथ सेंटर आणि एमएमआर मधील प्रस्तावित विकास केंद्रांची एकात्मिक सांगड घालून भविष्यातील आर्थिक विकासासाठी सक्षम परिसंस्था निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजित विस्तार, रोजगाराच्या संधी, गुंतवणूक, उद्योग आणि आधुनिक नागरी सुविधांचा विकास साधला जाणार आहे असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले...

  एम एम आर डी ए, आर पी जी सी एल आणि संबंधित सर्व संस्थांचे या भागीदारीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले असून झालेल्या सामंजस्य करारांचे आणि प्रस्तावित प्रकल्पांचे काम जलदगतीने पुढे नेउन त्याचे प्रत्यक्ष परिणाम जमिनीवर लवकरात लवकर दिसायला हवेत अशी अपेक्षा या वेळी व्यक्त केली...

रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये शंभर एकरांचा विकास प्रकल्प.

रायगड - पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि मॅपलट्री यांच्यात १०० एकराच्या मिश्र वापर विकास प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले... या प्रकल्पामध्ये  मॅपलट्री कडून विकासासाठी आवश्यक भांडवली व कार्यकारी भांडवल गुंतवणूक, मूल्यनिर्मिती, देश विदेशातील गुंतवणूकदार आणि जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत... या व्यवहारातून रायगड - पेण ग्रोथ सेंटर मध्ये १.१ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक  परकीय थेट गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे... यामुळे परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक आणि नागरी विकासाला चालना मिळणार आहे...

सुरबाना ज्युरोंगकडे प्रकल्प व्यवस्थापनाची जबाबदारी

रायगड - पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड सुरबाना ज्युरोंग यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा करार केला आहे... सुरबाना ज्युरोंग यांनी यापूर्वी रायगड - पेण ग्रोथ सेंटर साठी व्हिजन प्लॅन, मास्टर प्लॅन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन तयार केला आहे... प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या टप्प्यात संस्थेचा अनुभव महत्वपूर्ण ठरणार आहे... कंत्राटदाराकडून करण्यात येणाऱ्या कामांचे परीक्षण व मंजुरी, डिझाईन, अभियांत्रिकी आराखडे, रेखाचित्रे, कागदपत्रे आणि अन्य कामांचे परीक्षण करण्याची जबाबदारी सुरबाना जुराँग पार पडणार आहेत... तसेच बांधकामांची गुणवत्ता, कामाची प्रगती, करारातील अटींचे पालन, कामाच्या प्रगतीच्या टप्प्याचे प्रमाणन, कामगिरीचे निरीक्षण आणि आवश्यक सुधारणात्मक उपाययोजनांची शिफारस करण्याचे कामही याच संस्थेस करायचे आहे...

मुंबई ३.० साठी ३२४ चौ. की. मी. क्षेत्राचा मास्टर प्लॅन.

तिसरी मुंबई अर्थात मुंबई ३.० च्या नियोजित विकासासाठी महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जानेवारी २०२६ मध्ये स्वित्झर्लंड मधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान सुरबना ज्युरोंग आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या पातळीवर सामंजस्य करार करण्यात आला.

 या करारानुसार मुंबई महानगर प्रदेशातील विकास केंद्रांसाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे... त्यामध्ये तिसरी मुंबई अर्थात मुंबई ३.० चा समावेश आहे... मुंबई ३.० च्या नियोजनासाठी सुमारे ३२४ चौकिमी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे... या मास्टर प्लॅनच्या माध्यमातून जमिनीचा वापर, वाहतूक व दळणवळण व्यवस्था,  गृहनिर्माण, व्यावसायिक  व औद्योगिक क्षेत्रे, सामाजिक पायाभूत सुविधा तसेच अन्य नागरी पायाभूत सुविधांचे एकात्मिक नियोजन करण्यात येणार आहे... नियोजित विकास टप्प्याटप्प्याने आणि शाश्वत पद्धतीने करण्यासाठी या आराखड्याची मदत होणार आहे...

सार्वजनिक खाजगी भागीदारीतून विकासाला गती.

  रायगड - पेण ग्रोथ सेंटर आणि मुंबई ३.० च्या विकासासाठी एम एस आर डी ए आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खाजगी संस्थांमध्ये होत असलेली भागीदारी ही महाराष्ट्राच्या शहरी विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे... यापूर्वी एम एम आर डी ए कडून विविध नवीन क्षेत्रांचा विकास करण्यात आला आहे... आता आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार संस्थांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेत असल्याने भांडवली गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाचे नियोजन आणि प्रकल्प व्यवस्थापनाचा अनुभव यांचा लाभ महाराष्ट्राला मिळणार आहे...

    मॅपलट्री आणि सुरबाना ज्युरोंग सारख्या संस्था यांच्या सोबतची भागीदारी रायगड- पेण परिसराच्या विकासाला वेग देईल. या माध्यमातून गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, उद्योग व्यवसाय आणि आधुनिक नागरी सुविधा यांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे...

Post a Comment

Previous Post Next Post