महाराष्ट्र वेदभुमी

पाली-बल्लाळेश्वर मंदिर परिसर हादरला,अज्ञात वाहनाच्या धडकेत सलग पाच विघुत खांब कोसळले...

अलिबाग वार्ताहार (स्वाती जाधव): पाली-बल्लाळेश्वर मंदिर परिसरात सोमवारी दि.३ आँगस्ट सकाळी ८.०० ते ८.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार धडकेमुळे एक विघुत खांब कोसळला... एका पाठोपाठ एक असे सलग पाच विघुत खांब जमिनीवर कोसळले... घडलेल्या धक्कादायक घटनेत अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेमुळे हे विघुत खांब कोसळले...

सुदैवाने ही घटना सकाळी झाली असल्यामुळे गर्दी कमी होती... माञ हिच घटना दुपारच्या गर्दीच्या वेळी घडली असती, तर भीषण दुर्घटना घडण्याची शक्यता होती... ही गट ना बल्लाळेश्वर गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारापासून भक्तनिवासापर्यंतच्या मार्गावर घडली...

यांमुळे मंदिर परिसरात ये-जा करणारा भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले... घटनेची माहिती मिळताच पाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पराग मेहता यांनी तात्काळ महावितरण एमएसईबी अधिकारांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या...

त्यानंतर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले... कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि कोसळलेले खांब हटविण्याचे तसेच विघुत यंञणा पूर्ववत करण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले... दरम्यान या अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे... संबंधित वाहनाची ओळख पटताच त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून पाली पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया महावितरणकडून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post