रोहा प्रतिनिधी: (राकेश धुमाळ): रोह्याच्या मेहेंदळे हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत बारावीत शिकणाऱ्या तनिष्क प्रज्ञा समीर दांडेकर या विद्यार्थ्याने MAH-LL.B.(5 years integrated) CET 2026 या परीक्षेत 99.7482110 पर्सेंटाइल गुण मिळवून इतिहास घडवला आहे... १६ जून रोजी सदर परीक्षेचा निकाल लागल्यापासून, तनिष्क याने मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक, आप्तेष्ट नातेवाईक, मित्रमंडळीसह समाजबांधवांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे...
तनिष्कचे आईवडिल दोघेही उच्चशिक्षित असून आई मेहेंदळे हायस्कूल रोहा येथे कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिक्षिका असून वडील इन्स्ट्रुमेंट इंजिनियर असून रोहा औद्योगिक वसाहतीतील सोलवे केमिकल्स या कंपनीत मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत...
५ नोव्हेंबर २००७ रोजी जन्मलेला तनिष्क हा सुरवातीपासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असून कॉर्पोरेट लॉयर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने या परीक्षेची जोरदार तयारी केली होती... महाराष्ट्र शासनाने ८ मे २०२६ रोजी घेतलेल्या परीक्षेत पेन येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात त्याची परीक्षा झाली होती... GLC शासकीय विधी महाविद्यालयात पुढील शिक्षण घेण्याची त्याची इच्छा असून त्याने मिळविलेल्या उच्च गुणवत्तेमुळे त्याला महाराष्ट्रातील नंबर १ च्या महाविद्यालयात सहज प्रवेश मिळेल अशी आशा आहे...
