महाराष्ट्र वेदभुमी

एनईएस हायस्कूल खैरेखुर्दमध्ये फुड फेस्टिव्हल आनंदात साजरा...

रोहा प्रतिनिधी (शहानवाज मुकादम)

रोहा:तालुक्यातील खैरेखुर्द येथील एनईएस उर्दु हायस्कूल येथे सन:2025-26चा वार्षिक फुड फेस्टिव्हलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला...

 या कार्यक्रमाचे सुरवात श्रीम मुबीना असगर मुकादम यांच्या हस्ते करण्यात आली, या कार्यक्रमात ग्रामपंचायत खैरेखुर्दचे विद्यमान सरपंच श्री मुजम्मील अहमद गीते आणि तेज मराठी न्यूज चॅनेल, वेदभुमी न्युज चॅनेल, रायगडचे वादळ या वृत्तपत्राचे प्रतिनिधी शहानवाज मुकादम यांची प्रमुख उपस्थिती होती...

 सदर कार्यक्रमात एनईएस हायस्कूलचे चेअरमन सादिक महमद खोत सचिव असगर मुकादम सल्लागार बशीर पित्तु सर्व समिती सदस्य, राजिप प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, तारीख सर, शेख सर, नजमा मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल हमीद गीते, सर्व विद्यार्थी, खैरेखुर्द ग्रामस्थ, पालकवर्ग, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ, सुमैया मुल्ला आणि सर्व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते...

सदरचा फुड फेस्टिव्हलचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला... या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचायत समितीचे माजी सभापती व जिल्हा परिषद रायगडचे माजी सदस्य यांनी त्यांचा सुपुत्र मयुर याच्या लग्नाच्या शुभ मुहूर्तावर एनईएस हायस्कूल खैरेखुर्द करीता दहा हजार रुपयाची देणगी देण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post