महाराष्ट्र वेदभुमी

रामटेकमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत

 

युती-आघाडी फिसकटल्याने सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला

अध्यक्षपदासाठी ०५ तर नगरसेवक पदासाठी ७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात 

 प्रतिनिधी: सचिन चौरसिया 

रामटेक: नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचा राजकीय नकाशा आता स्पष्ट झाला असून, युती न झाल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत राजकीय तडजोड फसल्याचे समीकरण उघडकीस आले आहे... या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवार आहेत, ज्यात राजकीय पार्श्वभूमी असलेले चार प्रमुख चेहरे तसेच एक स्वतंत्र उमेदवारांचा समावेश आहे... नगर नगरपरिषद रामटेकच्या निवडणुकीत काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर आता तिथे अध्यक्षपदासाठी ०५ तर नगरसेवकपदासाठी ७१ उमेदवार रिंगणात आहे... अनेकांनी जनसामांन्यात आपली किंमत किती आहे हे आजमावण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे... अशात मात्र हवसे नवसे गवसे उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिल्याने मातब्बर उमेदवारांना मत विभाजनाच्या फटका बसणार आहे. रामटेक नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ज्योती कोल्लेपरा (भाजप) आणि बिकेंद्र महाजन शिवसेना (शिंदे गट) या दोन पक्षांमध्ये चुरस आहे... यांच्यासह रमेश करामोरे (कॉग्रेस) तर दामोधर धोपटे एक अपक्षांसह चौरंगी लढत होणार आहे... नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे बिकेंद्र महाजन, भाजपच्या ज्योतीताई कोल्हेपरा, ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून उमेदवारी मिळालेले रमेश कारामोरे तथा माझ्यावर अन्याय झाल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाला नुकताच बाय बाय करून नगर विकास आघाडीचा हात पकडणारे स्वतंत्र उमेदवार दामोदर धोपटे तसेच आकाश ढोबळे या उमेदवारांचा समावेश आहे... उल्लेखनीय म्हणजे नगराध्यक्षपदाचे पाच उमेदवार असले तरी येथे लढत चौरंगी होणार असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. त्याचप्रमाणे दुसरे एक महत्वाचे म्हणजे येथे वर्षानुवर्षापासुन काँग्रेस पक्षाची एकनिष्ठतेने धुरा सांभाळणारे तथा नगराध्यक्ष पदाचे दावेदार दामोधर धोपटे यांना ऐन वेळेवर काँग्रेसच्या वरीष्ठांनी कलाटनी देत रमेश कारामोरे यांना उमेदवारी दिल्याने दामोधर धोपटे यांनी काँग्रेस ला बाय बाय करीत आपल्या स्वतंत्र उमेदवारीचे अगाजन केले व नामांकन अर्ज दाखल केला... त्यामुळे येथे काँग्रेस मध्येच दुफळी निर्माण झाली असुन मतविभाजनाचा फटका दोन्ही उमेदवारांना बसणार अशी चर्चा लोकांमध्ये आहे...

मनसेसह ४ उमेदवारांचे धोपटेंना पाठबळ

स्वतंत्र उमेदवार दामोधर धोपटे यांनी काँग्रेसपक्ष सोडल्यावर त्यांना ॲड. प्रफुल अंबादे यांनी त्यांच्या नगर विकास आघाडीच्या माध्यमातुन मदतीचा हात दिला... सोबत मनसे जिल्हाध्यक्ष शेखर दुन्डे यांचेसह निवडणुकीत उभ्या असलेल्या चार उमेदवारांनी दामोधर धोपटे यांचेशी हात मिळवत त्यांना पाठबळ दिलेले आहे... आता हे सर्व धोपटेंसाठी छातीला माती लावुन भिडणार असुन धोपटेंसाठीही मत मागणार असल्याने धोपटेंची बाजु मजबुत झाली असल्याचे व आता रामटेकमध्ये चौरंगी लढत रंगणार असल्याचे लोकांमध्ये बोलल्या जात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post