प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा
गावांमध्ये घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा कचरा टाकण्यासाठी डस्टबिनचा वापर व्हावा , डस्टबिनमुळे दुषित आणि कुजलेला कचरा एकाच ठिकाणी साठवता येतो आणि तो आसपासच्या वातावरणापासून दूर नेता येतो . तर कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी डस्टबिन चा खुप फायदा होतो. ह्या बाबी लक्ष्यात घेऊन १५ वित्त आयोगातुन ४०० घरगुती कचराकुंडीचे ( डस्टबिन ) वाटप ग्रुप ग्रामपंचायत आरेबुद्रुक अंतर्गत येणाऱ्या आरेबुद्रुक , आरेखुर्द आणि कुंभोशी या गावांमध्ये करण्यात आले .
यावेळी सरपंच राजेंद्र मळेकर , ग्रामसेविका प्रिया कुंडे , सदस्या अनिता चोंडे , सदस्य चेतन शिंदे प्रशांत शिंदे , सुहास शिंदे , दगडू शिंदे , संकेत घाग , नरेश चोंदे , पुंडलिक घाग , परशुराम म्हात्रे सह ग्रामस्थ व महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . .
