उरण दि. २३ (अजय शिवकर) ज्येष्ठ नागरिक मंडळ मुळेखंड, तेलीपाडा, कुंभारवाडा, कोळीवाडा व परिसर ज्येष्ठ नागरिक मंडळ यांचा चतुर्थ वर्धापनदिन सोहळा गुरुवार (दि. २१) नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला...
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी भूषविले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे समाजसेविका अनिता घरत, उरण सामाजिक संस्थेचे संतोष पवार, मधुसदन म्हात्रे, प्रा. टेमकर, संजय होळकर गुरुजी, पत्रकार-लेखक अजय शिवकर,उमेश नाईक, करंजा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश थळे, कार्याध्यक्ष राजेंद्र घरत, चाणजे ग्रामपंचायत ग्रामसेवक चव्हाण आदी उपस्थित होते...
या दिवशी श्री सत्यनारायणाची महापूजा व विविध सांस्कृतिक विरंगुळा केंद्र मुळेखंड फाटा, उरण येथे आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यात तीर्थ प्रसाद, ज्येष्ठ नागरिक मंडळ - महिलांचा हळदी - कुंकू समारंभ, महाप्रसाद, मान्यवर, १० वी, १२ वी आणि पदवीधर गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार, क्रीडा, कला, शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्यांचा सन्मान चिन्ह, देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मंडळाचे कार्याध्यक्ष अनंत पाटील, अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, उपाध्यक्ष अंकुश म्हात्रे सचिव परशुराम पाटील, सहसचिव सुभाष गुरव, खजिनदार ईश्वर म्हात्रे, सहखजिनदार गोपीनाथ मांडेलकर व कमिटी सदस्य सदस्या आणि कोंब्रेड अशोक म्हात्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते...

