मुलुंड २८ ऑक्टोबर प्रतिनिधी: सतिश वि.पाटील
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवई आणि एल अँड टी रियालिटी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच तरुण उत्कर्ष मंडळ व रोटरी क्लब ऑफ मुलुंड यांच्या सहकार्याने आज तरूण उत्कर्ष विद्यामंदिर गव्हाण पाडा मुलुंड पूर्व मुंबई येथे आज निःशुल्क मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते... सदर शिबिरात २२५ पेक्षा लोकांनी सेवेचा लाभ घेतला. डोळे तपासणी व चष्मा, बीपी, शुगर, शारिरीक आजार, तसेच महिलांना अनेक शारीरिक व्याधी वर उत्तम असे मार्गदर्शन तसेच मोफत औषधे वाटण्यात आली, व्याधी ग्रस्त लोकांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करण्याचे सांगण्यात आले...
सदर मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन रोटरी क्लब ऑफ मुलुंड पूर्वच्या अध्यक्षा अनंत लक्ष्मी अय्यर आणि सहकारी तसेच तरुण उत्कर्ष मंडळाचे श्री भालचंद्र वैती अध्यक्ष, कैलास पाटील सचिव, यांनी केले होते, सदर वैद्यकीय शिबिर श्री उदय वैती, ऋषिकेश वैती, श्री.विकास वैती, श्री जयेश वैती श्री निशिकांत पाटील, श्री राजन भोसले , मुलुंड जेष्ठ पत्रकार:श्री.सतिश पाटील यांनी सहभाग घेऊन शिबिर यशस्वी केले...

