महाराष्ट्र वेदभुमी

पनवेल व उरण विधानसभा क्षेत्रात तरुणाईची लाट मनसेत घुसली.


उरण दि २२(विठ्ठल ममताबादे ): मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात मनसेच्या जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उपजिल्हाध्यक्ष दिपक कांबळी, तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, मनसे पर्यावरण  सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत घरत, महिला तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष गणेश तांडेल यांच्या प्रमुख उपस्थितीत चाणजे ग्रामपंचायत, उलवे नोड, मोहपाडा येथील असंख्य तरुणांनी मनसेत प्रवेश केला हे प्रवेश मनसेच्या वाहतूक सेनेचे  विधानसभा चिटणीस सतीश पाटील, तसेच मनसेचे उप तालुका अध्यक्ष भालचंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून झाला...तसेच पनवेल तालुक्यात खांदा कॉलनी येथील मनसे कार्यालयात कामोठे  तसेच शहरातील विविध भागातील तरुणांनी मनसे प्रवक्ते तथा महानगर अध्यक्ष योगेश चिले  व जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर  यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेत पक्षप्रवेश केला...दिवसेंदिवस मनसे कडे तरुणांचा ओढा वाढला असून मनसेचा करिष्मा तरुण वर्गात मोठया प्रमाणात दिसून येत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post