महाराष्ट्र वेदभुमी

लायन्स क्लब पनवेल तर्फे ५४ वे नेत्र चिकित्सा शिबिर



एस जी चव्हाण / पनवेल

शनिवार दिनांक ६/१/२०२४  ते सोमवार दिनांक ८/१/२०२४ पर्यंत व्ही के हायस्कूल येथे सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० या वेळेत मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया  सुसज्ज हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे..

अशा शिबिरामध्ये पनवेल लायन्स क्लबच्यावतीने मागील सतत ५३ वर्षात १६ हजाराच्या वर मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रिया व १ लाखाच्यावर चष्मे वाटप करण्यात आले.. अशाप्रकारे गरीब आणि गरजू व्यक्तींना त्यांची दृष्टी टिकवण्यासाठी मदत झाली आहे..

यावर्षी लायन्स क्लबचे ५४ वें वर्ष नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले आहे.. सदर नेत्र शिबिर व व नेत्र चिकित्सा शिबिर शनिवार दिनांक ६ जानेवारी यादरम्यान व्हीं के हायस्कूल पनवेल येथे नेत्र तपासणी होईल व रुग्णांची तेथेच निवासी व्यवस्था करण्यात आली आहे.. त्याच दिवसातून सुसज्ज हॉस्पिटलमधून अत्याधुनिक पद्धतीने तज्ञ डॉक्टरांच्या मार्पत रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे...

रुग्णांनी कपड्या व्यतिरिक्त कोणत्याही सामान आपल्या बरोबर आणू नये तसेच आधार कार्ड व रेशन कार्ड यांची प्रत व झेरॉक्स सोबत आणावी..

पनवेल लायन्स क्लबने १ जुलै २०२३ पासून ४३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली आहे.. नोव्हेंबर व डिसेंबर या दरम्यान ग्रामीण व आदिवासी कातकरी भागातील नेत्र शिबिर आयोजित केले होते..यामध्ये मोफत चष्मांचे वाटप करण्यात आले... नेत्र शिबिरात जवळजवळ १६० मोतीबिंदू असणारे रुग्ण आढळून आले आहेत.. त्यांची शस्त्रक्रिया ६ जानेवारी ते ८ जानेवारी २०२४ या आयोजित शिबिरा दरम्यान करण्यात येणार आहे.. पनवेल  लायन्स क्लबचा यावर्षी २५० ते ३०० मोतीबिंदू या शिबिरात करण्याचा  मानस आहे.. त्यामुळे  गरजूंनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे संस्थेचे अध्यक्ष ला श्री एस जी चव्हाण व सचिव  अशोक गिल्डा लायन्स क्लब पनवेल यांच्या वतीने करण्यात येत आहे..



Post a Comment

Previous Post Next Post