महाराष्ट्र वेदभुमी

एक संवाद आशांसोबत,सुदर्शन कंपनी अंतर्गत मार्गदर्शन शिबिराला सेविकांचा उस्पुर्त प्रतिसाद.



कोलाड (श्याम लोखंडे)

रोहा तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात जागतीक स्तरावर नावलौकिक असलेल्या सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमटेड या कारखान्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात या अनुषंगाने तसेच सामाजिक बांधिलकीतून शुक्रवार दि.२२/१२/२०२३ रोजी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड अंतर्गत सी एस आर च्या प्रमूख सौ.माधुरी सणस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ग्रामपंचायत वरसे या ठिकाणी रोहा तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविकांसाठी " एक संवाद आशांसोबत " हा संवाद मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या संवादाला येथील आशा सेविकांनी भरभरून प्रतिसाद दिला...

सदर या कार्यक्रम दरम्यान लेखक, सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते, व्यसनमुक्ती प्रेरणा संवर्धन तज्ञ किशोर काळोखे यांनी समजुतदार, सहनशीलता, सुसंवाद ,समुदाय संवाद या विषयी उत्तमरीत्या उपस्थीत आशासेविकाना मार्गदर्शन केले...तसेच सौ.स्वाती पवार यांनी देखील मनोबल वाढवणे या संदर्भात विविध मार्गदर्शन केले.तर सदरच्या आयोजित कार्यक्रमास रोहा तालुक्यातील एकुण १२५ आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या...

यावेळी रोहा तालुका आरोग्य सहाय्यक झावरे ,काॅर्डीनेटर मुंडे,आणि सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड सी एस आर विभागाचे चेतन चौधरी सह प्रमूख मान्यवर आदी आशा सेविका बहुसंख्येने उपस्थित होत्या .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमर चांदणे यांनी केले.तर विविध प्रकारची माहिती आणि मार्गदर्शनाचा लाभ घेत उपस्थित आशा सेवकांनी या बाबत आपले मत व्यक्त करत आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post