महाराष्ट्र वेदभुमी

जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रेंच्या हस्ते नांदगाव विभागासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा


रायगड/पाली : विशेष प्रतिनिधी

सीतापराव प्रतिष्ठानाचा उपक्रम 

नांदगाव येथील ग्रामस्थांसाठी उद्योजक विनेश सितापराव यांनी उपलब्ध करून दिली रुग्णवाहिका

सुधागड तालुक्यातील ग्रामीणभाग असलेल्या नांदगाव विभागासाठी सीतापराव प्रतिष्ठानच्यावतीने कै. बाबुराव सितापराव व कु. कै. वैष्णवी सितापराव याच्या स्मरणार्थ शिवसेना सुधागड तालुका संपर्क प्रमुख तथा उद्योजक विनेश सितापराव यांच्या सौजन्याने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला...नांदगाव येथील रुग्णांना अनेकदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्ह्यातील दवाखान्यात उपचारासाठी जाण्याची गरज पडते... त्यामुळे नांदगाव येथील ग्रामस्थांसाठी उद्योजक विनेश सितापराव यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली...

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा उपसंघटक राजेंद्र राऊत, मिहीर धारकर, तालुकाप्रमुख दिनेश चिले, तालुका संपर्कप्रमुख विनेश सितापराव, सितापराव प्रतिष्ठानचे गणेश सीतापराव, युवा सेनेचे तालुकाप्रमुख किरण पिंपळे, प्रशांत शितोळे, बजरंग खाडे, सतीश देशमुख, महिला आघाडी प्रमुख आरती सुरावकर, विभाग प्रमुख किशोर दिघे, आदींसह सुभाष रोड गणपती मंदिर विले पार्ले मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर येथील २१ गणपती मंदिराच्या सभागृहात पार पडला...

शिवसैनिकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित सितापराव प्रतिष्ठान उपक्रमाचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक

लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना सुरेंद्र म्हात्रे म्हणाले की विनेश सीतापराव यांच्या सीतापराव प्रतिष्ठानने ग्रामीण भागातील लोकांना अपघात प्रसंगी वेळेवर उपचार मिळावेत त्याकरिता तात्काळ दवाखान्यात पोहोचणे गरजेचे असते...त्यासाठी अचानक कोणते वाहन मिळत नाही त्याची दखल घेत या प्रतिष्ठानने आपल्याला रुग्णवाहिका भेट दिली आहे... तिचा योग्य प्रकारे वापर करण्याची जबाबदारी या विभागातील शिवसैनिकांची आहे आणि या रुग्णवाहिकेतून ग्रामीण विभागातील आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने चांगली सेवा देण्याचे काम आमचे शिवसैनिक नक्कीच करतील असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला...सदर लोकार्पण सोहळ्यास नांदगाव विभागातील शिवसैनिकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते... सितापराव प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे...

कोट : 

माझे वडील कै.बाबुराव सीतापराव आणि मुलगी कु. कै.वैष्णवी सीतापराव यांच्या स्मृती या आरोग्य सेवेतून कायम स्मरणात राहाव्यात, ग्रामीण भागातील आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना अपघात किवा आजाराप्रसंगी तात्काळ हॉस्पिटल ला घेऊन जाता यावे आणि त्यांचा जीव वाचावा याच हेतूने आम्ही रुग्णवाहिका दिलेली आहे...विनेश सितापराव,तालुका संपर्क प्रमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

Post a Comment

Previous Post Next Post