महाराष्ट्र वेदभुमी

प्रचाराचा श्रीफळ फोडला,रोहा तालुक्यामध्ये मनसे पक्ष जोमाने, कार्यकर्त्यांची दमदार हजेरी


धाटाव रोहा प्रतिनिधी महेश वाडकर 

ग्रामपंचायत व गावामध्ये नवनिर्माण घडवण्याच्या उद्देशाने उतरविले मनसे पक्षाचे उमेदवार व सदस्य मैदानात 

रोहा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्या असून प्रत्येक पक्ष आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत...मोठं मोठे नेते आमदार सुद्धा या निवडणूकमध्ये प्रचारात सामील झाले आहेत...यातच पहिल्यांदा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन ग्रामपंचायतीमध्ये तसेच गावामध्ये नवनिर्माण घडवण्याच्या उद्देशाने मनसे पक्षाने आपले सरपंच पदाचे उमेदवार तसेच सदस्य मैदानात उतरविले आहेत...रोहा तालुक्यात प्रतिष्ठीत समजली जाणारी आरे बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये मनसे पक्षाने आपला प्रचाराचा श्रीफळ फोडला आहे...


मनसे पक्षाने प्रचाराचा श्रीफळ फोडला मोठया संख्येने महाराष्ट्र सैनिक प्राचाराला सामील

यावेळी मोठया संख्येने महाराष्ट्र सैनिक या प्राचाराला सामील झाले होते... मनसे पक्षातर्फे सदस्य पदाचे उमेदवार म्हणून श्री नितीन गणपत मोंडे हे उमेदवार आहेत...दक्षिण रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर तसेच तालुका अध्यक्ष अक्षय रटाटे, उपतालुका अध्यक्ष सुरज मुटके, धाटाव विभाग अध्यक्ष महेश वाडकर, उपविभाग अध्यक्ष कुंजन भोकटे, माथाडी कामगार सेना रोहा तालुका सरचिटणीस कल्पेश शेळके, उपसरचिटणीस प्रताप खंडारे, तलाघर शाखा अध्यक्ष सुमित कांबळे, बोरघर शाखा अध्यक्ष साहिल दळवी, पिंगलसई शाखा अध्यक्ष विक्रांत जाधव, महाराष्ट्र सैनिक रोहित चव्हान, साहिल म्हसकर आदी महाराष्ट्र सैनिक प्रचारामध्ये सहभागी होते...

Post a Comment

Previous Post Next Post