कोलाड प्रतिनिधी(श्याम लोखंडे):
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी अपे रिक्षा आणि मालवाहू आयशर टेम्पो यांच्यात अपघात
मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर रिक्षा आणि मालवाहू टेम्पो यांच्यात सोमवारी रात्री अपघात घडल्याने सदरच्या अपघातात एक महीला जागीच मृत्यू झाल्याने सदरच्या घटनेने कोलाड आंबेवाडी नाक्यावर एकच खळबळ उडाली आहे...कोलाड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी अपे रिक्षा आणि मालवाहू आयशर टेम्पो यांच्यात कोलाड आंबेवाडी नाक्यावरील सरकारी दवाखान्यासमोर सदरचे अपघात घडले असून घडलेल्या अपघतात एक महिला जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत...
सौ सेजल किसन गायकर (३१) या महिलेस लहान मोठ्या गंभीर स्वरुपाच्या दुखापती होवून जागीच मृत्यू
वरील घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस उपनिरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले तसेच मिळालेल्या माहितीनुसार आपल्या ताब्यातील आयशर टेंपो क्र एम एच १२ एम ४५३६ हा मुंबई गोवा हायवे रोडने महाड बाजूकडे चालवीत घेवून जात असताना मौजे आंबेवाडी हददीत सरकारी हॉस्पीटल जवल आले वेळी महाड बाजुकडुन मुंबई बाजुकडे येणारी रियर रीक्षा एम एच ०६ बी व्ही ४६४२ ही वरील चालक आरोपी यांने सदरची रिक्षा अतीवेगाने हाइगाइने बेदकारपणे चालवित त्याच्या विरुध दिशेला जावून टेम्पोच्या उजव्या साइडला मागील बाजुच्या गाडला धडकून अपघात झाला सदर अपघातामध्ये रिक्षामधील मागे बसलेल्या भागीरथी खार रोहा येथील प्रवाशांपैकी अन्वी किसन गायकर (२) हीस गंभीर स्वरुपाच्या दुखापती झाल्या व सौ सेजल किसन गायकर (३१) या महिलेस लहान मोठ्या गंभीर स्वरुपाच्या दुखापती होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला तसेच किसन गायकर (३२) हे किरकोळ जखमी झाले असून यात दोन्ही वाहनांच्या नुकसान झाले आहे..
मोटर वाहन कायदा १८४ प्रमाणे नोंद झाली असून अधिक तपास पो नि बाबर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलिस अंमलदार पोहवा गायकवाड करत आहेत...
तर घडलेल्या घटनेची कोलाड पोलिस ठाण्यात ९६ / २०२३ भादवी सं कलम ३०४, अ २८९,३३७,३३८, मोटर वाहन कायदा १८४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून अधिक तपास मार्गदर्शक व्हीजीट रोहा करण्यात आली पोलिस निरीक्षक बाबर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलिस अंमलदार पोहवा गायकवाड करत आहेत...

