महाराष्ट्र वेदभुमी

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांनी स्टॅन्डअप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 




अलिबाग, (जिमाका) दि.0९/१०/२०२३:- 

केंद्र शासनाने स्टॅन्डअप इंडिया ही योजना घोषित केली आहे... या योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत योजना सुरु करण्यात आली आहे...

योजनेतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती साठीच्या सवलती 

या योजनेतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती साठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना १० % स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅन्डअप इंडिया योजनेंतर्गत ७५% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित लाभ व अनुदान १५% राज्य शासनामार्फत देण्यात येते...

स्टँडअप इंडिया योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या नवउद्योजक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) रायगड-अलिबाग यांचे कार्यालय, कच्छीभवन, नमीनाथ मंदिराजवळ, सेंटमेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग - ४०२२०१ येथे संपर्क साधावा...असे आवाहन सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) सुनिल जाधव यांनी केले आहे...


Post a Comment

Previous Post Next Post