अलिबाग प्रतिनिधी (ओमकार नागावकर) :
केंद्र शासनाच्या प्राप्त सूचनांनुसार आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत " स्वच्छता हीच सेवा " राबवला उपक्रम
केंद्र शासनाच्या प्राप्त सूचनांनुसार दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत " स्वच्छता हीच सेवा " हा उपक्रम डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक रायगड यांच्या मार्गदशनाखाली उत्साहात राबविण्यात आला...
विविध विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेऊन रुग्णालयीन परिसराची केली स्वच्छता
यावेळी डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक रायगड यांच्या मार्गदशनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील वैद्यकीय अधिकारी,मेट्रन, अधिपरिचारिका, परिचारिका, नर्सिंग स्कूलच्या विद्यर्थिनीं, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, डापकू विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच ईतर विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर मोहिमेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन रुग्णालयीन परिसराची स्वच्छता केली..
आयुष्यमान भव मोहिमअंतर्गत उपक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतले परिश्रम
सदर आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत "स्वच्छता हीच सेवा " हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता प्रत्यक्ष डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक रायगड, डॉ. शीतल जोशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक रायगड, डॉ. आशिष मिश्रा, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य), डॉ. एम. एस. क्षीरसागर, प्रशासकीय अधिकारी, राजेश केणी, कार्यालयीन अधीक्षक, संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डापकू रायगड तसेच ईतर विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले...
