महाराष्ट्र वेदभुमी

आदर्शगाव भातसई येथे श्री महादेवी मातेचा नवरात्र उत्सव


रोहा (वार्ताहर) 

हाकेला धावणारी नवसाला पावणारी आदर्शगाव भातसई येथिल श्री महादेवी माता 

हाकेला धावणारी नवसाला पावणारी आदर्शगाव भातसई येथिल श्री महादेवी मातेचा नवरात्र उत्सव भक्तीमय वातावर्नात साजरा झाला आहे...सालाबादप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी भातसई गावातुन पालखी फिरून महादेवी मंदीरात जाते...गावचे भगत चितामणी खरीवले यांच्या आगात देवीचा वारा येतो..अशी येथील जनमाणसांची श्रध्दा आहे..भातसई, झोळाबे, लक्ष्मीनगर, कोपरे गावातील भक्तगण आईच्या मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थितीत असतात...महादेवी आईची घटस्थापना उदो उदो चाग भल गजरात होत असतो...

आईच्या मंदिरात नवसकरी नऊ दिवस उपवास धरून मंदिरातच राहतात

श्री महादेवी मातेची घटस्थापना झाल्यानंतर चारी गावातील घरचे देवाची(कुल देवताचे)घटस्थापना केली जाते...आईच्या मंदिरात नवसकरी नऊ दिवस उपवास धरून मंदिरातच राहतात...आईची गोधंली नऊ दिवस तिन वेळा आरती करतो...आईच्या दर्शनासाठी  रायगड जिल्ह्यातील, मुंबई, पुणे  येथून भाविक येत असतात...नऊ दिवस काकड आरती  प्रवचन, हरिपाठ, किर्तन, भजन , नाच गाणी विविध कार्यक्रम होत असतात .खरिवले, कोतवाल, थोरवे, उशिरकर,जोशी, पोळेकर, म्हात्रे, गवळी,  जाबेकर, रटाटे, कनोजे, सकपाळ, पाटील, हे भातसई गावातील परिवार कार्यक्रम उपस्थितीत आसतात...

Post a Comment

Previous Post Next Post