पुगांव - खांब (नंदकुमार कळमकर)
रोहा तालुक्यातील पालेखुर्द गावचे रहिवासी सामजिक कार्यकर्ते तसेच पर्यावरण प्रेमी महादेव धोंडू मराठे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धपकाळाने व अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या या निधनाने मराठे परिवारांवर दुःखाचे डोंगर पालेखुर्द परिसरात शोककळा पसरली आहे..
रोप वाटिका नर्सरी
महादेव मराठे हे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात तसेच पर्यावरण प्रेमी
महादेव मराठे हे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात तसेच पर्यावरण प्रेमी होते गेली अनेक वर्षे त्यांनी किल्ला येथील कृषी विद्यापीठ येथील रोपवाटिका नर्सरीत मुकादम म्हणून सेवा केली तर सर्वांना मामा या नावाने सुपरिचित होते त्यांचा स्वभाव शांत संयमी प्रेमळ असा होता सदैव सर्वांच्या परोपकारी पडणाऱे संयमी वृत्तीच्या,मित भाषी,नम्र स्वभाव व दयाळू अंतःकरणाचे,पशु प्राण्यांवर अथंग प्रेम करणारे होते...त्यांच्या निधानाची वार्ता समजतात रोहा सह इतर तालुक्यातील समाजातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय आप्त-स्वकीय मित्र परिवार व नातेवाईक सगेसोयरे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेत त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले...
दशक्रियाविधी मंगळवार दिनांक २३ ऑक्टो. २०२३व अंतिम उत्तरकार्य तेरावे धार्मिकविधी गुरुवार २६ ऑक्टो.२०२३
त्यांच्या पश्चात एक बहीण शांताबाई गोविंद बाकाडे, रवींद्र गोविंद बाकाडे(भाचा), दिलीप धोंडगे, गणेश धोंडगे (भाचा) सुरेखा नामदेव शिंदे व हर्षदा हाशीराम मंचेकर भाची असा परिवार व मोठा मराठे परीवार आहे...त्यांचे दशक्रियाविधी मंगळवार दिनांक २३ ऑक्टो. २०२३ रोजी तसेच अंतिम उत्तरकार्य तेरावे धार्मिकविधी गुरुवार २६ ऑक्टो.२०२३ रोजी पालेखुर्द येथील त्यांच्या निवासस्थानी संपन्न होणार आहेत..
