महाराष्ट्र वेदभुमी

रोहा तालुका कुणबी समाज तालुका कार्यकारणीची सभा मोठ्या उत्साहात संपन्न

 

कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे) 

तालुका पदाधिकारी, विभागीय ग्रुपस्तरावरील कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित 

कुणबी समजोन्नोती संघ मुबंई ग्रामीण शाखा तालुका रोहा तालुका यांची तालुका कार्यकारणी सभा मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी कै.माजी आमदार पा.रा.सानप कुणबी समाज सभागृह रोहा येथे तालुका अध्यक्ष शिवराम भाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली...यावेळी तालुका पदाधिकारी तसेच विभागीय ग्रुप स्तरावरील कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...कुणबी समाज नेते शंकरराव म्हसकर, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव भगत, रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्ष सुरेश मगर, माजी उप सभापती पं.सं.रोहा रामचंद्र सपकाळ, तालुका उपाध्यक्ष मारुती खांडेकर, रायगड जिल्हा सरचिटणीस शिवराम महाबळे, दत्ताराम झोलगे, गोपीनाथ गंभे,रोहा तालुका युवक अध्यक्ष अनंत थिटे,सुहास खरीवले, चणेरा ग्रुप अध्यक्ष नरेद्र सकपाळ, धाटाव ग्रुप अध्यक्ष दिनेश रटाटे,ऐणघर ग्रुप अध्यक्ष यशवंत हळदे,आरे ग्रुप.अध्यक्ष पांडुरंग कडू,शशिकांत कडू, कोलाड ग्रुप अध्यक्ष संदेश लोखंडे, खांब ग्रूप सचिव वसंत मरवडे,मेढा ग्रुप अध्यक्ष राम करंजे,म्हसकर, धामणसई ग्रुप अध्यक्ष खेळु ढमाल, गिजे,महेश बामुगडे,संतोष भोईर, गुणाजी पोटफोडे, नामदेव म्हसकर,सह तालुक्यातील जेष्ठ श्रेष्ठ कुणबी समाज बांधव व आदी कार्यकरणी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते...


विभागीय समाज गठित,पक्षहिन कुणबी समाज बांधणी, कुणबी समाजाचे आजीव सभासद होण्याचे आवाहन 

मोठ्या उत्साही वातावरणात लाभलेल्या या सभेत तालुक्यातील चणेरा विभागाप्रमाणे कुणबी भवन,धाटाव विभाग शाखेत कुणबी भवन उभारण्यात येणार असल्याने त्यांच्या सर्व कार्यकारणीचे रोहा तालुका अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच विभागीय समाज अधिक गठित करा पक्षहिन कुणबी समाजाची बांधणी करा त्याचबरोबर कुणबी समाजाचे आजीव सभासद मोठ्या संख्येने व्हा असे आवाहन केले...कुणबी समाजाच्या समाज नेते शंकरराव म्हसकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की समाज्यातील जातीच्या दाखल्यासाठी  येणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून सर्व तालुक्यातील समाज बांधवांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे...तसेच यासाठी ग्रुपस्तरावर समाज अधिक गठित करा तसेच महीला संघटना देखिल अधिक बळकट झाली पाहिजे त्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत...

ओबीसी कुणबी आरक्षणाला कोणताही धक्का लागु नये, ते सहन केले जाणार नसल्याची करण्यात आली चर्चा

तर ओबीसी अध्यक्ष सुरेश मगर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की सर्व ग्रुपमधील गावपातळीवर कुणबी समाज जनगणना करण्यात यावी यासाठी अधिक ग्रुपस्तरावर विविध सभा आयोजीत करून त्याची जनजागृती केली पाहिजे गाव,वाडी,वस्तीमध्ये कुणबी समाजाची किती घर आहेत लोकसंख्या सह जनगणना केली पाहिजे...असे आवाहन समाज बांधवांना यावेळी केले...जेष्ठ समाज नेते  शिवराम महाबंळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मुंबई संघावर जास्तीतजास्त अजिव सभासंदांची नोंदणी करा...असा ठराव या प्रसंगी सर्वानुमते घेण्यात आला....मराठा समाजाच्या कुणबी म्हणुन दाखले दिले जातात यावर सरकारकडून त्यांना स्वतंत्र दाखले देण्यात यावे ओबीसी कुणबी आरक्षणाला कोणताही धक्का लागता कामा नये अन्यता ते सहन केले जाणार नसल्याची ही चर्चा या प्रसंगी करण्यात आली..त्याचबरोबर कुणबी समाजातील आजच्या परिस्थिती वर जेष्ठ नेते रायगड जिल्हा कुणबी समाज उपाध्यक्ष शंकरराव भगत,अंनत थिटे, महेश बामुगडे यांनी देखील समाजाविषयी आपले मनोगत व्यक्त केले..


Post a Comment

Previous Post Next Post