महाराष्ट्र वेदभुमी

परीक्षे पे चर्चा कार्यक्रमात मुख्याध्यापिका योगिनी देशमुख यांचा सहभाग!

 


रोहा - विशेष प्रतिनिधी :- 

एम.डी.एन. फ्युचर स्कूल वरसगाव कोलाडच्या मुख्याध्यापिका सौ.योगिनी प्रशांत देशमुख यांनी परीक्षे पे चर्चा कार्यक्रमात सहभाग 

एम.डी.एन. फ्युचर स्कूल वरसगाव कोलाडच्या मुख्याध्यापिका सौ.योगिनी प्रशांत देशमुख यांनी परीक्षे पे चर्चा कार्यक्रमात महत्वपूर्ण सहभाग घेऊन चांगले सादरीकरण केले आहे...त्यांचे सादरीकरण व व्यक्त केलेल्या मतप्रदर्शनावर पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असून योगिनी देशमुख यांना मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही असलेले पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे...


योगिनी देशमुख यांच्या कामगिरीबद्दल शैक्षणिक क्षेत्रासह समाजातील स्तरातून अभिनंदन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमात सहभाग दर्शवून सौ. योगिनी प्रशांत देशमुख यांनी महत्वपूर्ण सादरीकरण केले..या कार्यक्रमात संपुर्ण देशभरातून शिक्षण क्षेत्रातील नामवंत शिक्षक बंधू आणि भगिनी सहभागी झाल्या होत्या. यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातून व रायगड जिल्ह्यातून सौ. योगिनी देशमुख यांनी सहभाग घेऊन सद्य परिस्थितीतील शिक्षण, देश व विद्यार्थी याबाबत चांगले मतप्रदर्शन करून या कार्यक्रमात दखलपात्र राहिल्या...त्यांचे सादरीकरण व व्यक्त केलेल्या मतप्रदर्शनावर प्रभावित होऊन पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनीही शाबासकी देत पंतप्रधान कार्यालयाकडून योगिनी देशमुख यांना उत्तम आरोग्यासाठी व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही असलेले पत्र नुकतेच मिळाले आहे... दरम्यान योगिनी देशमुख यांच्या या कामगिरीबद्दल शैक्षणिक क्षेत्रासह समाजातील स्तरातून अभिनंदन होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post