महाराष्ट्र वेदभुमी

ग्रीन वर्क्स ट्रस्टचा पुढाकार..धाटाव औद्योगिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी केला पक्षी, प्राणी व जलचर प्राण्यांचा सूक्ष्म अभ्यास,

रोहा:(विशेष प्रतिनिधी) :

वन्यजीव सप्ताहनिमित्त धाटाव हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी सस्तन प्राण्यांचा अभ्यास सूक्ष्म प्रत्यक्ष चित्रफितीद्वारे अनुभवला

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी पक्षी, प्राणी व जलचर प्राण्यांचा सूक्ष्म अभ्यास करत सस्तन प्राण्यांची माहिती घेतली...सस्तन प्राणी आपल्या पिल्लांचे संगोपण कश्या प्रकारे करतात याची माहिती ग्रीन वर्क्स ट्रस्टच्या संस्थापक कृपा पाटील यांनी वन्यजीव सप्ताह निमित्त धाटाव हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना दिली. सस्तन प्राण्यांचा सूक्ष्म विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष चित्रफितीद्वारे अनुभवला... सस्तन प्राण्यांचा सूक्ष्म अभ्यास शिकवत असताना विद्यार्थी आनंदी झाले होते... जलचर प्राणी, पक्षी व प्राण्यांचे राहणीमान, खाणपान, आवडीनिवडी, सवयी, बचाव करण्यासाठी काय उपाय करतात, भक्ष पकडण्यासाठी कोणते पर्याय निवडतात, आपल्या शरीराचा वापर त्यात्या परिसरात कश्या प्रकारे करतात अशी संपूर्ण माहिती ग्रीन वर्क्स ट्रस्ट च्या संस्थापिका कृपा पाटील यांनी दिली...

ग्रीन वर्क्स ट्रस्टच्या सहाय्यक सोनम पाटील,मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित 

यावेळी ग्रीन वर्क्स ट्रस्ट च्या सहाय्यक सोनम पाटील, धाटाव हायस्क्यूलचे मुख्याध्यापक दत्तात्रेय पाटील, सहाय्यक शिक्षक हनुमंत चव्हाण, जनार्दन पिंगळे, सुनील पगारे, रोहन अहिवळे, सहाय्यक शिक्षिका सुशीला चव्हाण, लता मोरे, कविता कांबळे, तनुजा खाडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post