रोहा विशेष प्रतिनिधी
पालक मंत्री उदयजी सामंत व रोहा तालुका शिवसेना अध्यक्ष ॲड मनोजकुमार शिंदेंच्या दिले हस्ते नियुक्ती पत्र
रायगड रोहा तालुक्यातील बेधडक नेतृत्व धडाकेबाज निर्भिड लेखणीचे श्री राकेश येलकर यांना महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री तथा रायगड रत्नागिरी पालक मंत्री श्री उदयजी सामंत आणि रोहा तालुका शिवसेना अध्यक्ष ॲड श्री मनोजकुमार शिंदे यांच्या हस्ते रोहा तालुका युवा नेता खांब देवकान्हे पिंगळसई विभाग प्रमुख पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे...तसेच त्यांच्या समवेत रोहा शहर प्रमुख श्री मंगेशजी रावकर शिवसेना उप अध्यक्ष संदेश मोरे अन्य पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित उपस्थित होते...
कोणत्याही विषयावर बोलताना आपला स्वपक्ष आवाज निर्भिड आणि बुलंद असाच लोकांच्या मनावर बिंबवला
श्री राकेश येलकर हे देवकान्हे रोहा येथील स्थानिक रहिवाशी असून ते महाराष्ट्र लोकशाही न्युज चॅनलचे मुख्य संपादक आहेत...राकेश येलकर हे आपल्या निर्भिड लेखणीतून समाजासाठी नेहमीच तत्पर असे कार्य करीत आले आहेत... आजतागायत त्यांनी कोणत्याही विषयावर बोलताना आपला स्वपक्ष निर्भिड आणि बुलंद असाच लोकांच्या मनावर बिंबवलेला आहे..त्यासाठी त्यांनी कधीही न डगमगता आपला आवाज आपले विचार जिवंत ठेवलेले आहेत...राजकारणी असो वा पुढारी यांच्याबद्दल तंतोतंत बोलताना ते नेहमीच आपली जागृत अशी भूमिका मांडत आलेले आहेत...त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हे नियुक्ती पत्र देण्यात आलेले आहे..