महाराष्ट्र वेदभुमी

रोहा येथे महिला किसान दिवस कार्यशालेला उस्पुर्त प्रतिसाद,यशस्वी महिलांचा केला सन्मान .


कोलाड  प्रतिनिधी (श्याम लोखंडे ) 

१६ ऑक्टोबर हा महीला कृषि दिवस म्हणून तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत या अनुषंगाने तालुकास्तरीय महिला किसान दिवस कार्यशाळा रोहा कृषि अधिकारी आणि श्री विवेकानंद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्युट रोहा यांच्या संयुक्तं विद्यमाने दमखाडी रोहा येथे आयोजित करण्यात आले होते सदरच्या या उपक्रमाला तालुक्यातील असंख्ये महिलांनी प्रतिसाद दिला...

तालुक्यातील सक्षम महीला शेतकरी मोठया संख्येने उपस्थित 

रोहा तालुका कृषि अधिकारी आणि श्री विवेकानंद रिसर्ज ट्रेनिंग इन्स्टिट्युट रोहा यांच्या संयुक्तं विद्यमाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते तर मोठ्या उत्साही वातावरण लाभलेल्या या कार्यक्रमाला रोहा तालुका कृषि अधिकारी महादेव करे,डॉ सलमा मुकादम, श्री विवेकानंद रिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्युट चे संचालक श्री नंद, श्री रुरेकर, राहुल जोशी, कृषि सहायक ,कृषि पर्यवेक्षक,मंडळ कृषि अधिकारी , बी टी एम व महिला तसेच तालुक्यातील सक्षम महीला शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होत्या...उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी महादेव करे साहेब यांनी केले...प्रसंगी यावेळी महिला सक्षमीकरण ,महिलांची कृषि क्षेत्रातील कामगिरी , यशस्वी महिला उद्योजकांची कार्यशैली ,विविध शेतकरी गट ,महिला शेतकरी उत्पादक कंपन्या याविषयी माहिती तसेच कृषि विषयक मोलाची माहिती उपस्थित वर्गाला दिली...

महिलांसाठी प्रशिक्षण ,कृषि पूरक व्यवसाय ,उद्योग यासाठी  अधिक भरीव काम करणार -श्री नंद साहेब

 यावेळी कार्यशाळेत डॉ .सलमा मुकादम यांनी महिलांचे आरोग्य ,योग्य आहार , महिलांचे आजारपण त्यावरील उपाय व उपचार ,प्राथमिक तपासण्या व कौटुंबिक जबाबदारी व आरोग्यविषयक योजना याविषयी माहिती दिली.तसेच विवेकानंद संस्थेचे संचालक श्री नंद साहेब यांनी महिलांसाठी प्रशिक्षण ,कृषि पूरक व्यवसाय ,उद्योग यासाठी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२४ मध्ये अधिक भरीव काम करणार असल्याचे सांगितले...


१४ यशस्वी महिलांचे कृषि क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आले 

सदर कार्यशाळेस लाभलेले जिल्हा संसाधन व्यक्ती राहुल जोशी यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) यावर सखोल मार्गदर्शन करत विशेष माहिती दिली व सूक्ष्म उद्योग प्रस्ताव तयार करण्याचे आवाहन प्रसंगी शेतकरी महिलांना करत  एकूण १४ यशस्वी महिलांचे कृषि क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन यावेळी सन्मान करण्यात आले...तसेच प्रशिक्षणार्थी यशस्वी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले व शेवटी प्रश्नोत्तरे घेण्यात आली असून नंतर या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन करून करण्यात आली...


Post a Comment

Previous Post Next Post