रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथे नवरात्रौत्सव दरम्यान येथील कळमकर भावकी यांच्या वतीने कुलदैवत घटी बसल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते...
सदरच्या कार्यक्रमात पुगांव गावातील समस्त कळमकर भावाकीच्या वतीने श्री काळभैरव महिला नाच मंडळ पालेखुर्द यांनी आपल्या लोककलेची कुलस्वामिनीचे गण, स्तवन, प्रार्थना, जोगवा जागर,तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे गीत गाऊन सर्व कळमकर भावकी तसेच पुगांव ग्रामस्थ महिला तसेच उपस्थीत रसिक प्रेशाकंची मने जिंकून आपल्या नाच गाण्याने मंत्रमुग्ध केले . तर त्यानी केलेल्या कलेचे सादरीकरण तसेच गीत गायनावर ,नाचावर खुश होऊन कळमकर भावकीतील तसेच हौशी ग्रामस्थ नागरिकांनी बक्षिसांचा वर्षाव केला...
यावेळी श्री काळभैरव महिला नाच मंडळातील गीतकार गायनचार्य सौ पुष्पलता नारायण बाकडे व ढोलकीपटू चिंधू ठाकूर समस्त नाच महिला मंडळाचे समस्त कळमकर भावाकीच्या वतीने त्यांचे खूप कौतुक करत त्यांना श्रीफळ शाळ देऊन शेवटी त्यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला.
