महाराष्ट्र वेदभुमी

सामाजिक क्षेत्रात राज्यात नाही तर देशात अग्रेसर ठरणाऱ्या स्वदेश फाऊंडेशनच्या सहकार्यातून बोंडशेतल गावी किराणा दुकानचे शानदार उद्घाटन!


निजामपूर प्रतिनिधी:(एकनाथ मानकर)

स्वदेश फाऊंडेशनच्या विशेष सहकार्यातून बोंडशेत गावी किराणा दुकानचे शानदार उद्घाटन

सामाजिक क्षेत्रात राज्यात नाही तर देशात अग्रेसर ठरणाऱ्या स्वदेस फाऊंडेशनच्या विशेष सहकार्यातून, बोंडशेत गावातील तरूणांचा एकजुट तथा गावसामितीच्या अथक प्रयत्नातून किराणा आणि जनरल स्टोअर्सचा शानदार उद्घाटन सोहळा स्वदेश फाउंडेशनेचा मेघना फडके मॅडम, आणि शेतकरी सेवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर साळवी यांच्या संयुक्त शूभहस्ते  संपन्न झाला...यावेळी स्वदेशचे मॅनेजर, भिमराव भालेराव,  शितल सुर्यवंशी,दि वाई अर्बन बँक व्यवस्थापक श्री.सुमित काळे, कोलाड पूर्व विभाग शेतकरी सेवा संघाचे सचिव दशरथ पवार, माजी अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष विष्णू मोरे, उपाध्यक्ष दत्ताराम जाधव, स्वदेश  प्रतिनिधी शाम गिरकर, कोस्ते गाव विकास समिती अध्यक्ष गोविंद उंडरे, जावठे अध्यक्ष शेपोंडे, ज्येष्ठ ग्रामस्थ संभाजी जाधव, ग्रामस्थ तथा पत्रकार एकनाथ मानकर, पोलिस पाटील सुनिल उभारे, वडाचीवाडी गावचे ग्रामस्थ विष्णु कदम, यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला भगिनी आणि सर्व बोंडशेतकर ग्रामस्थ,महिला मंडळ, मुंबईकर,युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते... 

राज्यातील संकल्प केलेल्या स्वप्नातील गाव अभियानात बोंडशेत गाव पहिल्या टप्प्यात ७५ गावे तदनंतर १०० गावे एकूण १७५ गावात अग्रेसर 

देशाचा अमृतमहोत्सव निमित्त स्वदेश फाऊंडेशने,राज्यात संकल्प केलेल्या स्वप्नातील गाव अभियानातील पहिल्या टप्प्यात सुमारे ७५ गावे तदनंतर १०० गावे अशी एकूण १७५ गावात अग्रेसर ठरणाऱ्या बोंडशेत गाव समितीने नागरिकांच्या सोयीसाठी तसेच स्वदेश फाउंडेशनच्या संकल्पनेतून किराणा मालाचा दुकानाचे शानदार उद्घाटन हे वरील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले...यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात गावाच्या एकजुटीचे कौतुक केले...तर स्वदेश फाउंडेशनच्या मॅनेजर फडके मॅडम यांनी गाव समितीचे कौतुक करताना बोंडशेत गावाने एकजुटीचे दर्शन घडवून  गावाच्या विकासासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकून आपले किराणा दुकान चालू करून आमच्या स्वप्नातील गाव संकल्पनेतील इतर गावांना एक आदर्श  निर्माण केल्याचे सांगितले... तसेच अशा आदर्श ठरणाऱ्या गावाला  स्वदेशच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करू.. असे ठोस आश्वासन दिले...

उपस्थितांचा गाव समितीच्या माध्यमातूनच यथोचित सन्मान करुन अध्यक्ष संजोग मानकर यांनी व्यक्त केले आभार 

 तसेच यावेळी सर्व उपस्थितांचा गाव समितीच्या माध्यमातूनच यथोचित सन्मान करुन अध्यक्ष संजोग मानकर यांनी आभार व्यक्त करताना, स्वदेशने आपल्या या किराणा दुकानासाठी स्वदेशच्या माध्यमातून जोडलेली स्वप्नातील गावे  जोडून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करताना त्यांना किराणा साहित्य सवलतीच्या दरात देऊन फ्री होम डिलिव्हरी देवू असे सांगीतले...तसेच ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनाही किराणा दुकानाचा लाभ घेण्याची विनंती करुन आलेल्या मान्यवरांचे, ग्रामस्थांचे आभार मानताना आपल्या किराणा दुकानाच्या अधिक माहितीसाठी व्यवस्थापक सुहास मांडवकर,अध्यक्ष संजोग मानकर, सचिव नरेश कदम, ध्रुवबाळ मांडवकर,सुभाष जाधव यांना संपर्क करावा...असे विनम्र आवाहन केले...सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री काळभैरव गाव विकास समितीचे सर्व सदस्य,सल्लागार यांनी विशेष मेहनत घेतली...

किराणा दुकानाच्या माहितीसाठी यांना संपर्क करावा,माहिती समितीमार्फत आली देण्यात

व्यवस्थापक सुहास मांडवकर ९३७००८३२९४ 

अध्यक्ष संजोग मानकर ९२६०१७०५७० 

सचिव नरेश कदम +९१७९७७७६५५०७ 

ध्रुवबाळ मांडवकर ९५२७२९७७४१ 

सुभाष जाधव यांच्या ८६०५१२०५४६ 


Post a Comment

Previous Post Next Post