कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे )
रोहा तालुक्यातील खांब पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या मौजे चिल्हे तेथे श्रावण मास प्रारंभ निमित्ताने महिनाभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येतात..तर हिंदू धर्मात श्रावण मास महिना हा पवित्र महिना म्हणुन या महिन्यात धार्मिक उत्साह म्हणून विविध ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यात येतात.. याच अनुषंगाने येथील ग्रामस्थांच्यावतीने येथील आराध्य ग्राम दैवत श्री धाक्सूद महाराज व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात श्री ग्रंथराज राम विजय या ग्रंथाचे वाचन या महीन्यात करण्यात आले होते.. यावेळी असंख्ये ग्रामस्थ महिला माता भगीनिनी याचा लाभ घेतला...
श्रावणमास ग्रंथ वाचन परंपरा आजही अस्तित्वात..श्रावण मासात ४० अध्यायांचा रामविजय ग्रंथ पारायण
कोकण वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान स्वा.सु.नि.वै.गुरुवर्य अलिबागकर महाराज, वै.गुरुवर्य गोपळबाबा वाजे,वै.गुरुवर्य धोंडू बाबा कोल्हटकर,यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या खांब पंचक्रोशीत मौजे चिल्हे येथे त्यांच्या कृपा आशिर्वादाने तसेच मूळ मार्गदर्शक वै. ह.भ.प. नारायणदादा लोखंडे यांच्या मार्गदर्शनातून चालत आलेली श्रावणमास ग्रंथ वाचन परंपरा आजही अस्तित्वात असून श्रावण मासात ४० अध्यायांचा रामविजय ग्रंथ पारायण श्रावणमास प्रारंभात याचे वाचन करत ह.भ.प. ज्ञानेश्वर महारज लोखंडे यांनी त्याचे अर्थ मार्गदर्शनातून पटवून दिले.. तर श्रावणाच्या प्रथम दिनी सरू करण्यात आलेल्या या ग्रंथाची सांगता मोठ्या उत्साह वातावरणात नुकतीच करण्यात आली..
श्रावण महीन्यात ग्रंथाचे वाचन, हरिपाठ, हरिभजन,असे विविध धार्मिक कार्यक्रम यशस्वी
वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या चिल्हे गावात मोठया भक्ती भावाने विविध सण आध्यत्मिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.. तर श्रावण महीन्यात ग्रंथाचे वाचन, हरिपाठ, हरिभजन,असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले...यावेळी गाव कमिटी आणि ग्रामस्थ, महीला, व युवकांनी याचा लाभ घेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले...
